ग्रुपमध्ये बदल कसे करावेत
Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
बाय डीफॉल्ट, ग्रुपमधील कोणताही सदस्य ग्रुपचे नाव, फोटो, माहिती बदलू शकतो किंवा मेसेजेस पाठवू शकतो. तथापि, फक्त ॲडमिन्सना ग्रुप माहिती संपादित करता यावी किंवा सहभागी सदस्यांना मंजुरी देता यावी अशा पद्धतीने ग्रुप ॲडमिनला ग्रुप सेटिंग्ज बदलता येतात.
ग्रुपची माहिती बदलणे
ग्रुपचे नाव बदलणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय> ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय
- ग्रुप आयकॉन आणि ग्रुपचे नाव यांच्या शेजारील संपादित करावर टॅप करा.
- ग्रुपचे नवीन नाव एंटर करा, त्यानंतर सेव्ह करा वर टॅप करा.
- ग्रुपच्या नावामध्ये जास्तीतजास्त २५ कॅरॅक्टर्स असू शकतात.
- तुम्ही इमोजीवर टॅप करून तुमच्या माहितीमध्ये इमोजी समाविष्ट करू शकता.
ग्रुपचा फोटो बदलणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय> ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय
- ग्रुप आयकॉन > संपादित करायावर टॅप करा.
- नवीन इमेज जोडण्यासाठी, तुमची गॅलरी, कॅमेरा, इमोजी आणि स्टिकर्स वापरा किंवा वेबवर शोधा वापरण्याचा पर्याय निवडा अथवा तुम्ही आयकॉन काढू शकता.
ग्रुपची माहिती बदलणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय> ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय
- ग्रुपची माहिती वर टॅप करा.
- नवीन माहिती एंटर करा, त्यानंतर ठीक आहे वर टॅप करा.
ग्रुप ॲडमिन म्हणून नवीन सहभागी सदस्यांना मंजुरी द्या
ग्रुप सेटिंग्ज मध्ये नवीन सहभागी सदस्यांना मंजुरी द्या सुरू असल्यास, सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही सदस्याला ॲडमिनने मंजुरी देणे आवश्यक आहे.
- प्रलंबित विनंत्या असल्यास, चॅट टॅबवर ग्रुपच्या नावाखाली नोटिफिकेशन दिसेल.
- प्रलंबित सहभागी सदस्य पाहण्यासाठी प्रलंबित विनंत्यांच्या मेसेजवर टॅप करा.
- तुम्ही एखाद्याला मंजुरी दिल्यास, त्यांना ग्रुपमध्ये जोडले जाईल. तुम्ही त्यांची विनंती नाकारल्यास, त्यांना ग्रुपमध्ये जोडले जाणार नाही.
संबंधित लेख: