ग्रुपमध्ये बदल कसे करावेत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
Mac
बाय डीफॉल्ट, ग्रुपमधील कोणताही सदस्य ग्रुपचे नाव, फोटो, माहिती बदलू शकतो किंवा मेसेजेस पाठवू शकतो. तथापि, फक्त ॲडमिन्सना ग्रुप माहिती संपादित करता यावी किंवा सहभागी सदस्यांना मंजुरी देता यावी अशा पद्धतीने ग्रुप ॲडमिनला ग्रुप सेटिंग्ज बदलता येतात.
ग्रुपची माहिती बदलणे
ग्रुपचे नाव बदलणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • किंवा, सर्वात वर कोपऱ्यात असणाऱ्या
      किंवा
      वर आणि त्यानंतर, ग्रुपची माहिती वर क्लिक करा.
  2. ग्रुपच्या नावाच्या उजवीकडील
    वर क्लिक करा.
  3. ग्रुपचे नवीन नाव एंटर करा आणि ते सेव्ह करण्यासाठी
    वर क्लिक करा.
    • ग्रुपच्या नावामध्ये जास्तीतजास्त १०० कॅरेक्टर्स असू शकतात.
    • तुम्ही
      वर क्लिक करून तुमच्या ग्रुपच्या नावामध्ये इमोजी समाविष्ट करू शकता.
ग्रुपचा फोटो बदलणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • किंवा, सर्वात वर कोपऱ्यात असणाऱ्या
      किंवा
      वर आणि त्यानंतर, ग्रुपची माहिती वर क्लिक करा.
  2. वर कर्सर न्या, त्यानंतर ग्रुपचा फोटो बदला वर क्लिक करा.
  3. नवीन फोटो जोडण्यासाठी फोटो पहा, फोटो घ्या, फोटो अपलोड करा, इमोजी आणि स्टिकर किंवा वेबवर शोधा यापैकी एक पर्याय निवडा किंवा फोटो काढा.
ग्रुपची माहिती बदलणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • किंवा, सर्वात वर कोपऱ्यात असणाऱ्या
      किंवा
      वर आणि त्यानंतर, ग्रुपची माहिती वर क्लिक करा.
  2. ग्रुपविषयी माहितीच्या उजवीकडील
    वर क्लिक करा.
  3. नवीन माहिती लिहा, त्यानंतर सेव्ह करण्यासाठी राखाडी रंगाच्या बरोबरच्या खुणेवर
    क्लिक करा.
    • तुम्ही
      वर क्लिक करून तुमच्या माहितीमध्ये इमोजी समाविष्ट करू शकता.
ग्रुप ॲडमिन म्हणून नवीन सहभागी सदस्यांना मंजुरी द्या
ग्रुप सेटिंग्ज मध्ये नवीन सहभागी सदस्यांना मंजुरी द्या सुरू असल्यास, सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही सदस्याला ॲडमिनने मंजुरी देणे आवश्यक आहे.
  1. प्रलंबित विनंत्या असल्यास, चॅट टॅबवर ग्रुपच्या नावाखाली नोटिफिकेशन दिसेल.
  2. प्रलंबित सहभागी सदस्य पाहण्यासाठी प्रलंबित विनंत्यांच्या मेसेजवर क्लिक करा.
  3. तुम्ही एखाद्याला मंजुरी दिल्यास, त्यांना ग्रुपमध्ये जोडले जाईल. तुम्ही त्यांची विनंती नाकारल्यास, त्यांना ग्रुपमध्ये जोडले जाणार नाही.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही