ऑटो-डाउनलोड कसे कॉन्फिगर करावे

तुम्हाला तुमच्या नवीन फोटोंचा त्वरित ॲक्सेस मिळावा यासाठी WhatsApp बाय डिफॉल्ट मोबाइल इंटरनेटच्या मदतीने तुमच्या इमेजेस आपोआप डाउनलोड करते. ऑडिओ आणि व्हिडिओ हे फक्त वाय-फायवरून आपोआप डाउनलोड होतील.

तुम्ही WhatsApp > सेटिंग्ज > स्टोरेज आणि डेटा उघडून तुमची प्राधान्ये व्यवस्थापित करू शकता. WhatsApp ने हे फोटो, ऑडिओ, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स आपोआप कधी डाउनलोड कराव्यात हे तुम्ही इथे निवडू शकता. प्रत्येक प्रकारच्या मीडिया फाइलवर टॅप करा आणि कधीच नाही, वाय-फाय किंवा वाय-फाय आणि मोबाइल डेटा यांमधून निवडा.
लक्षात ठेवा: कोरोना व्हायरसच्या (COVID-19) साथीमध्ये WhatsApp इतर सर्व्हिसेसची मदत घेणार आहे ज्यामुळे मोबाइल नेटवर्क ट्रॅफिक कमी होण्यास मदत होईल. मोबाइल नेटवर्क बॅंडविड्थच्या समस्येत सुधारणा व्हावी म्हणून आम्ही काही प्रदेशांमध्ये डॉक्युमेंट्स, व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेजेसकरिता ऑटो-डाउनलोड बंद केले आहे.
कधीच नाही
मीडिया फाइल्स कधीच आपोआप डाउनलोड होणार नाही. प्रत्येक फाइल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला त्यावर मॅन्युअली टॅप करायला लागेल.
टीप: तुम्ही तुमची ऑटो-डाउनलोड सेटिंग्ज कधीही नाही वर सेट केल्यास, तुमचे व्हिडिओ आपोआप डाउनलोड होणार नाहीत. अर्थात, तुम्ही जेव्हा व्हिडिओ प्ले करता तेव्हा व्हिडिओ लगेच सुरू होतो व डाउनलोड प्रक्रिया पार्श्वभूमीमध्ये सुरू होते.
वाय-फाय
तुमच्या घरातल्या इंटरनेटच्या वाय-फाय हॉटस्पॉटशी जोडलेले असता तेव्हा मीडिया फाइल्स आपोआप डाउनलोड होतील.
वाय-फाय आणि मोबाइल डेटा
तुमच्याकडे जेव्हा केव्हा इंटरनेट कनेक्शन असेल तेव्हा मीडिया फाइल्स आपोआप डाउनलोड होतील.
तुमच्याकडे मर्यादित डेटा प्लॅन असल्यास, मीडिया फाइल्स फक्त वाय-फायशी कनेक्ट केलेले असतानाच ऑटो-डाउनलोड व्हाव्यात अशा पद्धतीने सेटिंग करावे अशी आम्ही शिफारस करतो.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्मवर ऑटो-डाउनलोड कसे कॉन्फिगर करावे: Android
हे मदतीचे होते का?
होय
नाही