कॅटलॉगची लिंक शेअर करणे

Android
iPhone
कॅटलॉगच्या मदतीने तुमच्या सद्य आणि भावी ग्राहकांना तुमच्या बिझनेसची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस पाहता येतात, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारता येतात आणि तुमच्या बिझनेसशी संपर्क साधता येतो. ग्राहक त्यांना रस वाटतो ती प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस त्यांच्या मित्रमैत्रीणींसोबत शेअर करू शकतात किंवा त्यांच्याबाबत प्रश्न विचारण्यासाठी बिझनेसला मेसेज करू शकतात.
कॅटलॉगमधून एखादे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
  1. **कॅटलॉग** वर जा
  2. तुम्हाला शेअर करायचे आहे ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस निवडा
  3. लिंकच्या चिन्हावर टॅप करा
  4. त्यानंतर तुम्ही तुमच्या संपर्कांसोबत किंवा संभाव्य ग्राहकांसोबत तुमच्या कॅटलॉगमधील काही विशिष्ट प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस शेअर करू शकता. त्यासाठी तुम्ही खालीलपैकी एक पर्याय निवडू शकता:
    • WhatsApp Business द्वारे लिंक पाठवा: हा पर्याय वापरून तुम्ही निवडलेल्या प्रॉडक्ट/सर्व्हिसची लिंक WhatsApp वरून इतरांसोबत शेअर करू शकता
    • लिंक कॉपी करा: हा पर्याय वापरून तुम्ही लिंक कॉपी करू शकता
    • लिंक शेअर करा: हा पर्याय वापरून तुम्ही ईमेल किंवा इतर मेसेजिंग ॲप्सवरून निवडलेले प्रॉडक्ट/सर्व्हिस किंवा कॅटलॉग शेअर करू शकता.
  5. तुम्हाला ज्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटसोबत प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करायची आहे, ते चॅट निवडा.
  6. 'पाठवा' चिन्हावर टॅप करा.
ज्या व्यक्तीला कॅटलॉगची किंवा प्रॉडक्ट/सर्व्हिसची लिंक पाठवली आहे, त्या व्यक्तीने ती लिंक WhatsApp Messenger किंवा WhatsApp Business मधून उघडल्यास थेट कॅटलॉग उघडेल.
पण कॅटलॉगची लिंक ईमेल किंवा ब्राउझरवरून शेअर केली असल्यास, लिंक मिळवणाऱ्या व्यक्तीला ती लिंक उघडण्यासाठी योग्य ते ॲप निवडावे लागेल.
टीप: तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत कॅटलॉगची लिंक शेअर केलीत आणि लिंक मिळवणारी व्यक्ती Android 6.0 च्या आधीची आवृत्ती वापरत असेल, तर त्या व्यक्तीला लिंक्स उघडता येणार नाहीत
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही