Android ॲप लॉक कसे वापरावे

Android
गोपनीयतेतून अतिरिक्त सुरक्षा मिळवण्याकरिता तुम्ही तुमच्या फोनवरील WhatsApp वर ॲप लॉक सुरू करू शकता. हे सुरू झाल्यावर ॲपचा ॲक्सेस अनलॉक करण्यासाठी तुम्हाला तुमचे फिंगरप्रिंट किंवा चेहरा वापरावा लागेल. 'ॲप लॉक' या फीचरमुळे ॲप लॉक केलेले असले, तरी तुम्ही कॉलला उत्तर देऊ शकता.
हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅनिंग यांसारखी बायोमेट्रिक्स सेट करावी लागतील.
ॲप लॉक सुरू करणे
 1. WhatsApp उघडा > अधिक पर्याय
  > सेटिंग्ज > गोपनीयता यावर टॅप करा.
 2. तळापर्यंत स्क्रोल करा आणि ॲप लॉक वर टॅप करा.
 3. बायोमेट्रिक वापरून अनलॉक करा सुरू करा.
 4. कन्फर्म करण्यासाठी फिंगरप्रिंट सेन्सरला स्पर्श करा किंवा तुमचा चेहरा स्कॅन करा.
 5. फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनची सूचना दिसण्याअगोदर किती वेळ जाऊ द्यावा हे निवडण्याकरिता टॅप करा.
  • नवीन मेसेजेसच्या नोटिफिकेशन्समध्ये मेसेजमधील मजकुराचे पूर्वावलोकन पाहायचे असल्यास, नोटिफिकेशन्समध्ये आशय दाखवा सुरू करा.
ॲप लॉक बंद करणे
 1. WhatsApp उघडा > अधिक पर्याय
  > सेटिंग्ज > गोपनीयता यावर टॅप करा.
 2. तळापर्यंत स्क्रोल करा आणि ॲप लॉक वर टॅप करा.
 3. बायोमेट्रिक वापरून अनलॉक करा बंद करा.
टीप:
 • फिंगरप्रिंट लॉक हे फीचर फक्त Google फिंगरप्रिंट API ला सपोर्ट करणाऱ्या फिंगरप्रिंट सेन्सरने युक्त आणि Android 6.0+ ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या Android डिव्हाइसेसवर उपलब्ध आहे.
 • फेस स्कॅनिंग केवळ फेस स्कॅनरने युक्त Android डिव्हाइसेसवर उपलब्ध आहे.
 • या फीचरला Samsung Galaxy S5, Samsung Galaxy Note 4 किंवा Samsung Galaxy Note 8 वर सपोर्ट नाही.
 • चेहरा आणि फिंगरप्रिंट यांचे ऑथेंटिकेशन पूर्णपणे तुमच्या डिव्हाइसवर होते. WhatsApp तुमच्या डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टीमने स्टोअर केलेली बायोमेट्रिक माहिती ॲक्सेस करू शकत नाही.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही