Google ड्राइव्ह वर बॅकअप घेणे
Android
Google ड्राइव्ह बॅकअप वापरण्यासाठी, तुमच्याकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे:
- तुमच्या डिव्हाइसवर सक्रिय Google खाते असावे.
- तुमच्या डिव्हाइसवर Google Play सर्व्हिसेस इंस्टॉल केलेल्या असाव्यात. हे Google Play स्टोअर वरून डाउनलोड केलेली ॲप्स आणि Google ॲप्स अपडेट करण्यासाठी वापरले जाते.
- बॅकअप तयार करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवर पुरेशी मोकळी जागा असावी.
- तुमच्या डिव्हाइसवर वेगवान आणि स्थिर इंटरनेट कनेक्शन असावे.
Google ड्राइव्ह बॅकअप्स सेट करणे
- WhatsApp उघडा.
- आणखी पर्याय> सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप > Google ड्राइव्ह वर बॅकअप घ्या वर टॅप करा.
- किती वेळा बॅकअप घ्यायचा हे कधीही नाही हा पर्याय सोडून तुम्हाला हव्या त्या इतर पर्यायावर सेट करा.
- तुम्हाला ज्या Google खात्यावर तुमच्या पूर्वीच्या चॅटचा बॅकअप घ्यायचा आहे ते खाते निवडा.
- तुमच्याकडे कनेक्ट केलेले Google खाते नसल्यास, सूचित केल्यावर खाते जोडा वर टॅप करा आणि तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.
- तुम्हाला ज्या नेटवर्कवरून बॅकअप घ्यायचा आहे ते नेटवर्क निवडण्यासाठी यावरून बॅकअप घ्या वर टॅप करा.
टीप: मोबाइल डेटा नेटवर्कवरून बॅकअप घेताना अतिरिक्त डेटा शुल्क आकारले जाऊ शकते.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप सुरू करणे
अधिक सुरक्षिततेसाठी, तुम्ही तुमच्या Google ड्राइव्ह बॅकअपसाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन सुरू करू शकता.
- WhatsApp उघडा.
- अधिक पर्याय> सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप > एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप यावर टॅप करा.
- सुरू करा वर टॅप करा.
- नवीन पासवर्ड तयार करा किंवा ६४ अंकी एन्क्रिप्शन की वापरा.
- तुमचा एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप तयार करण्यासाठी तयार करा वर टॅप करा.
Google ड्राइव्ह वर मॅन्युअल बॅकअप घेणे
तुम्ही Google ड्राइव्ह वर कधीही तुमच्या चॅटचा मॅन्युअल बॅकअप घेऊ शकता.
- WhatsApp उघडा.
- आणखी पर्याय> सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप > बॅकअप घ्या यावर टॅप करा.
Google ड्राइव्ह बॅकअप सेटिंग्ज कॉन्फिगर करा
तुमच्या Google ड्राइव्ह बॅकअप ची वारंवारता बदलणे
- WhatsApp उघडा.
- आणखी पर्याय> सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप > Google ड्राइव्ह वर बॅकअप घ्या यावर टॅप करा.
- किती वेळा बॅकअप घ्यायचा ते निवडा.
बॅकअपसाठी वापरायचे खाते बदलणे
- WhatsApp उघडा.
- आणखी पर्याय> सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप > Google खाते यावर टॅप करा.
- तुम्हाला ज्या Google खात्यावर तुमच्या पूर्वीच्या चॅटचा बॅकअप घ्यायचा आहे ते खाते निवडा.
टीप: तुम्ही तुमचे Google वरील तुमचे अकाउंट बदलल्यास, तुम्ही त्या खात्यामध्ये सेव्ह केलेल्या कोणत्याही बॅकअप्सचा ॲक्सेस गमवाल.
बॅकअपसाठी वापरायचे नेटवर्क बदलणे
- WhatsApp उघडा.
- आणखी पर्याय> सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप > सुरुवातीपासून बॅकअप घ्या यावर टॅप करा
- तुम्हाला बॅकअपसाठी जे नेटवर्क वापरायचे आहे ते निवडा.
संबंधित लेख: