लाईव्ह लोकेशन कसे वापरावे

Android
iPhone
लाईव्ह लोकेशन फीचर वापरून तुम्ही सध्या कुठे आहात ते वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमधील सहभागी सदस्यांसोबत शेअर करू शकता. तुम्ही तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करायचे की नाही किंवा किती काळ शेअर करायचे हे नियंत्रित करू शकता. तसेच तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करणे तुम्ही कधीही थांबवू शकता. शेअर करणे थांबवल्यावर किंवा शेअरिंग कालावधी एक्स्पायर झाल्यावर तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर केले जाणार नाही. तुम्ही तुमचे लाईव्ह लोकेशन ज्या व्यक्तींसोबत शेअर केले आहे, त्यांना तुमचे लोकेशन स्थिर थंबनेल इमेज म्हणून दिसत राहील आणि इमेजवर टॅप करून त्यांना तुमचे शेवटी अपडेट केलेले लोकेशन पाहता येईल.
हे फीचर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले आहे. याचाच अर्थ, तुमचे लाईव्ह लोकेशन तुम्ही ज्या व्यक्तींबरोबर शेअर केले आहे, फक्त त्यांनाच ते दिसेल, इतर कोणालाही नाही. WhatsApp वरील सुरक्षेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया WhatsApp सुरक्षा पेजला भेट द्या. WhatsApp वर गोपनीयता कशी जपली जाते याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे गोपनीयता धोरणही वाचू शकता.
तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करणे
 1. WhatsApp साठी लोकेशन परवानग्या सुरू करण्यासाठी, तुमच्या फोनच्या सेटिंग्ज मध्ये जा > ॲप्स > WhatsApp > परवानग्या > लोकेशन यावर टॅप करा > WhatsApp सुरू करा. तुम्ही ‘फक्त ॲप वापरत असताना अनुमती द्या,’ ‘प्रत्येक वेळी विचारा,’ आणि ‘अनुमती देऊ नका’ यांमधून तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडू शकता.
 2. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
 3. > लोकेशन > लाईव्ह लोकेशन शेअर करा यावर टॅप करा.
 4. तुम्हाला जेवढ्या कालावधीसाठी तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करायचे आहे तो कालावधी निवडा. निवडलेल्या कालावधीनंतर तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर होणे बंद होईल.
  • तुम्हाला हवे असल्यास, टिप्पणी जोडा.
 5. वर टॅप करा.
लाईव्ह लोकेशन शेअर करणे थांबवणे
विशिष्ट चॅटमध्ये लाईव्ह लोकेशन शेअर करणे थांबवणे
 1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
 2. शेअर करणे थांबवा > थांबवा यावर टॅप करा.
सर्व वैयक्तिक चॅट आणि ग्रुप चॅट्समध्ये तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करणे थांबवणे
 1. > सेटिंग्ज > गोपनीयता > लाईव्ह लोकेशन यावर टॅप करा.
 2. शेअर करणे थांबवा > थांबवा यावर टॅप करा.
टीप:
 • तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्ज > ॲप्स > WhatsApp > परवानग्या > लोकेशन > अनुमती देऊ नका यावर टॅप करून WhatsApp साठी लोकेशन परवानग्या कधीही बंद करू शकता.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही