विनंती केलेली नसतानाही व्हेरिफिकेशन कोड मिळणे

दुसरी एखादी व्यक्ती तुमचा फोन नंबर वापरून WhatsApp खात्याची नोंदणी करायचा प्रयत्न करत असेल, तर तुमच्या खात्याचे रक्षण करण्यासाठी WhatsApp तुम्हाला एक पुश नोटिफिकेशन पाठवेल. तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा व्हेरिफिकेशन कोड कोणासोबतही शेअर करू नका.
तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळाले आहे याचा अर्थ कोणीतरी तुमचा फोन नंबर वापरून नोंदणी कोड मिळवण्याचा प्रयत्न करते आहे. कोणीतरी त्यांचा नंबर टाइप करत असताना चुकून तुमचा नंबर टाइप केला म्हणूनही असे घडू शकते किंवा कोणीतरी तुमचे खाते बळकवायचा प्रयत्न करत असल्यास असे घडू शकते.
तुमचा WhatsApp व्हेरिफिकेशन कोड इतरांसोबत कधीही शेअर करू नये. कोणीतरी तुमचे खाते बळकवायचा प्रयत्न करत असल्यास त्यांना तसे सहज करता येणार नाही. त्यांना तुमच्या फोन नंबरवर पाठवल्या गेलेल्या एसएमएस व्हेरिफिकेशन कोडची गरज भासणार आहे. तुमचा नंबर वापरून तुमचे खाते बळकवू पाहणारी व्यक्ती या कोडशिवाय पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकणार नाही आणि WhatsApp वर तुमचा फोन नंबर वापरू शकणार नाही. याचा अर्थ तुमच्या WhatsApp खात्यावर फक्त तुमचे नियंत्रण राहील.
तुम्ही फोन नंबरचे आधीचे मालक असल्यास, नंबर्स कसे बदलावेत हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
टीप:
  • तुमचा फोन नंबर वापरून नक्की कोण WhatsApp वर पडताळणी करण्याचा प्रयत्न करत आहे, याबद्दलची माहिती WhatsApp कडे नसते.
  • WhatsApp एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा देते आणि तुमचे सर्व मेसेजेस तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेले असतात. याचाच अर्थ दुसऱ्या डिव्हाइसवरून तुमचे खाते ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला तुमची पूर्वीची संभाषणे वाचता येणार नाहीत.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही