खाते बॅन होण्याविषयी माहिती


तुमचे खाते बॅन झाले, तर WhatsApp उघडताना तुम्हाला खालील मेसेज दिसेल: "या खात्याला WhatsApp वापरण्याची अनुमती नाही."
खात्यामधील अ‍ॅक्टिव्हिटी आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करते आहे असे आम्हाला वाटले, तर आम्ही ती खाती बॅन करतो. उदाहरणार्थ, ते खाते स्पॅम, घोटाळ्यामध्ये सामील असल्यास किंवा WhatsApp वापरकर्त्यांच्या सुरक्षेस धोका निर्माण करत असल्यास.
तुमचे खाते चुकून बॅन करण्यात आले आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर कृपया आम्हाला ईमेल करा किंवा पुनरावलोकनाची विनंती करा यावर टॅप करा आणि आम्ही या विषयात लक्ष घालू. आमचे पुनरावलोकन पूर्ण होताच आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.
तुम्ही ॲपमध्ये पुनरावलोकनाची विनंती केल्यास, तुम्हाला एसएमएसद्वारे ६ अंकी नोंदणी कोड पाठवला जाईल आणि तो एंटर करण्यास सांगितले जाईल. तो कोड एंटर केला, की तुम्ही तुमची विनंती पुनरावलोकनासाठी सबमिट करू शकाल आणि आम्हाला पुनरावलोकनात मदत होऊ शकेल असे तपशील जोडू शकाल.
कोणकोणत्या कृतींनी आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन होते याविषयी आणि WhatsApp चा सुयोग्य वापर कसा करावा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या सेवाशर्तींमधील "आमच्या सेवांचा अधिकृत वापर" हा विभाग काळजीपूर्वक वाचावा असे आम्ही सुचवतो.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही