ग्रुपमध्ये एखाद्याला 'मेन्शन' अर्थात नमूद कसे करावे

तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या ग्रुपमध्ये असल्यास, तुम्ही मेसेजमध्ये “@” चिन्ह टाइप करून आणि संपर्काचे नाव निवडून त्यांना नमूद करू शकता. तुम्ही एखाद्या व्यक्तीला नमूद करता तेव्हा, त्या संपर्काला नमूद केले गेले आहे हे कळवण्यासाठी त्यांना नोटिफिकेशन पाठवले जाते.

टीप: ग्रुपमधील एखाद्या संपर्कास नमूद केल्यास आणि त्या संपर्काने तुमचे खाजगी चॅट म्यूट केलेले नसल्यास, त्या संपर्काने ग्रुपसाठी सेट केलेली कोणतीही म्यूट नोटिफिकेशन्स ओव्हरराइड केली जातील.
तुम्हाला ग्रुपमधील संभाषणे पाहण्यास वेळ मिळाला नसेल तर, तुम्ही तुम्हाला नमूद केलेले किंवा उत्तर दिलेले मेसेजेस ग्रुपच्या तळाशी कोपऱ्यात दिसणाऱ्या "@" बटणावर टॅप करून त्वरित पाहू शकता.
हे मदतीचे होते का?
होय
नाही