पूर्वीचे चॅट रिस्टोअर कसे करावे

Android
iPhone
iCloud बॅकअप मधून तुमचे पूर्वीचे चॅट रिस्टोअर करणे
  1. एखादा iCloud बॅकअप आधीपासून अस्तित्वात आहे का, हे पाहण्यासाठी WhatsApp > सेटिंग्ज > चॅट > चॅट बॅकअप येथे जा.
  2. अखेरचा बॅकअप कधी घेतला होता हे दिसत असल्यास, WhatsApp हटवा आणि पुन्हा इंस्टॉल करा.
  3. फोन नंबरची पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचे पूर्वीचे चॅट रिस्टोअर करण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचना फॉलो करा.
टीप :
  • iCloud वापरण्यासाठी तुम्ही Apple ID वापरून लॉग इन करणे आणि iCloud Drive सुरू असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या iCloud आणि iPhone मध्ये पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. तुमच्या फोन मध्ये आणि तुमच्या iCloud खात्यामध्ये तुमच्या बॅकअपला लागणाऱ्या जागेपेक्षा किमान २.०५ पट अधिक जागा असणे आवश्यक आहे.
  • बॅकअपसाठी जो फोन नंबर वापरण्यात आला होता, तोच फोन नंबर बॅकअप रिस्टोअर करण्यासाठी वापरणे आवश्यक आहे. तुम्हाला दुसऱ्या WhatsApp खात्यावरून पूर्वीचे चॅट रिस्टोअर करता येणार नाही.
  • ज्या फोन नंबरवरून बॅकअप घेण्यात येतो, त्या फोन नंबरशी बॅकअप संलग्न असतात. त्यामुळे, एकाच iCloud खात्यामध्ये अनेक WhatsApp खात्यांचे अनेक बॅकअप्स आहेत असे होऊ शकते.
संबंधित लेख :
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही