मीडिया फाइल्स कशा पाठवाव्यात

Android
iPhone
वेब आणि डेस्कटॉप
Windows

मीडिया फाइल्स, डॉक्युमेंट्स, लोकेशन किंवा संपर्क पाठवणे
 1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
 2. अटॅच करा
  वर टॅप करा. त्यानंतर पुढील पर्याय उपलब्ध असतील:
  • तुमचा कॅमेरा वापरून नवीन फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी कॅमेरा वर टॅप करा. टीप: WhatsApp वापरून रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओची मर्यादा 16MB इतकी आहे.
  • तुमच्या iPhone च्या फोटो किंवा अल्बम्समधून फोटो अथवा व्हिडिओ निवडण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ लायब्ररी वर टॅप करा. फोटो किंवा व्हिडिओ निवडल्यानंतर, एकाचवेळी एकाहून अधिक फोटो किंवा व्हिडिओ निवडण्यासाठी, तळाशी डाव्या कोपऱ्यात असलेल्या जोडा
   वर टॅप करा.
  • iCloud Drive किंवा Google Drive, Dropbox अशा ॲप्समधून डॉक्युमेंट निवडण्यासाठी डॉक्युमेंट वर टॅप करा. टीप: डॉक्युमेंट पाठवण्याची सोय फक्त iOS 12 आणि त्यापुढील आवृत्ती वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही जास्तीत जास्त 2 GB साइझचे डॉक्युमेंट पाठवू शकता.
  • तुमचे लोकेशन किंवा जवळपास असलेले ठिकाण पाठवण्यासाठी लोकेशन वर प्रेस करा.
  • संपर्काची माहिती पाठवण्यासाठी संपर्क वर टॅप करा. बाय डिफॉल्ट, तुम्ही निवडलेल्या संपर्कांची फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये स्टोअर केलेली सर्व माहिती शेअर केली जाईल. तुम्ही शेअर करू इच्छित नाही अशा माहितीची निवड रद्द करण्यासाठी संपर्क शेअर करा स्क्रीनवरील पर्यायांवर टॅप करा.
 3. तुम्ही फोटो किंवा व्हिडिओला कॅप्शनदेखील जोडू शकता. प्रत्येक फोटोला कॅप्शन देण्यासाठी फोटो एकामागून एक स्वाइप करत कॅप्शन देत चला.
 4. पाठवा
  वर टॅप करा.
तुम्ही Facebook किंवा Instagram वरील व्हिडिओ लिंक्सदेखील पाठवू शकता. या लिंक्स WhatsApp मधूनच प्ले करता येतात. तुम्ही तुमच्या चॅटमध्ये लिंक पेस्ट केल्यानंतर त्या लिंकचे पूर्वावलोकन दाखवले जाईल.
टीप: मीडिया फाइल्स, डॉक्युमेंट्स, लिंक्स, लोकेशन किंवा संपर्क पाठवण्यासाठी, तुम्हाला ॲपला iPhone सेटिंग्ज > गोपनीयता यामध्ये तुमच्या iPhone च्या लोकेशन सर्व्हिसेस, संपर्क, फोटो आणि कॅमेरा ॲक्सेस करण्याची अनुमती देणे आवश्यक आहे.
उच्च गुणवत्तेच्या मीडिया फाइल्स पाठवा
 1. WhatsApp सेटिंग्ज वर टॅप करा.
 2. स्टोरेज आणि डेटा वर टॅप करा.
 3. अपलोड करायच्या मीडिया फाइल्सची गुणवत्ता वर टॅप करा.
 4. ऑटो (शिफारस केलेले), सर्वोत्तम गुणवत्ता किंवा डेटा सेव्हर वर टॅप करा.
टीप: जास्त रेझोल्यूशन असलेल्या मीडिया फाइल्स जास्त डेटा वापरतील.
मीडिया फाइल्स, डॉक्युमेंट्स, लोकेशन्स किंवा संपर्क फॉरवर्ड करणे
 1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
 2. तुम्ही पाठवू इच्छित असलेल्या मेसेजच्या प्रकारावर टॅप करून होल्ड करा, त्यानंतर फॉरवर्ड करा वर टॅप करा. तुम्ही एकापेक्षा जास्त मेसेजही निवडू शकता.
 3. फॉरवर्ड करा
  वर टॅप करा.
 4. तुम्ही मेसेज फॉरवर्ड करू इच्छित असलेले चॅट निवडा, त्यानंतर फॉरवर्ड करा वर टॅप करा.
तुम्ही मीडिया, डॉक्युमेंट्स, लोकेशन्स किंवा संपर्क फॉरवर्ड केल्यावर तुम्हाला ते पुन्हा अपलोड करावे लागणार नाहीत. तुम्ही फॉरवर्ड केलेले, पण तुम्ही स्वत: तयार न केलेले मेसेजेस "फॉरवर्ड केलेले" या लेबलसह प्रदर्शित केले जातील.
टीप: मीडिया फाइल्ससोबत मथळे फॉरवर्ड केले जाणार नाहीत.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही