मीडिया फाइल्स, संपर्क किंवा लोकेशन पाठवणे
Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
मीडिया, डॉक्युमेंट्स, लोकेशन किंवा संपर्क पाठवणे
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- झटपट फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी अथवा अटॅच करण्यासाठी, वर टॅप करा. किंवा,वर टॅप करा. त्यानंतर:
- तुमच्या फोनवरून कमाल २ GB चे डॉक्युमेंट निवडण्यासाठी डॉक्युमेंट वर टॅप करा.
- तुमचा कॅमेरा वापरून नवीन फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी कॅमेरा वर टॅप करा.
- तुमच्या फोनमध्ये आधीपासून असलेला फोटो किंवा व्हिडिओ निवडण्यासाठी गॅलरी वर टॅप करा. कमाल १०० इमेजेस निवडण्यासाठी टॅप करून धरून ठेवा.
- तुमच्या फोनमध्ये आधीपासून असलेला ऑडिओ पाठवण्यासाठी ऑडिओ वर टॅप करा.
- तुमचे लोकेशन किंवा जवळपास असलेले ठिकाण पाठवण्यासाठी लोकेशन वर प्रेस करा. तुमच्या डिव्हाइसचे लोकेशन शेअर करण्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
- WhatsApp वरून तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह केलेल्या संपर्कांची माहिती पाठवण्यासाठी संपर्क वर टॅप करा.
- तुम्ही फोटो किंवा व्हिडिओला कॅप्शनदेखील जोडू शकता. प्रत्येक फोटोला कॅप्शन देण्यासाठी फोटो एकामागून एक स्वाइप करत कॅप्शन देत चला.
- वर टॅप करा.
टीप: अटॅच केलेल्या फोटो किंवा व्हिडिओची गुणवत्ता ॲडजस्ट करण्यासाठी
वर टॅप करण्याआधी,
> सर्वसाधारण गुणवत्ता किंवा HD गुणवत्ता > पूर्ण झाले यावर टॅप करा. (HD व्हिडिओ पाठवण्याची क्षमता सध्या सर्व देशांमध्ये उपलब्ध नसू शकते.)


मीडिया फाइल्स, डॉक्युमेंट्स, लोकेशन्स किंवा संपर्क फॉरवर्ड करणे
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- तुम्हाला जो मेसेज पाठवायचा आहे त्यावर टॅप करून धरून ठेवा. तुम्ही एकापेक्षा जास्त मेसेजही निवडू शकता.
- वर टॅप करा.
- तुम्हाला मेसेज ज्या चॅटला फॉरवर्ड करायचा आहे ते चॅट निवडा.
- वर टॅप करा.
तुम्ही मीडिया, डॉक्युमेंट्स, लोकेशन्स किंवा संपर्क फॉरवर्ड केल्यावर तुम्हाला ते पुन्हा अपलोड करावे लागणार नाहीत. तुम्ही फॉरवर्ड केलेले, पण तुम्ही स्वतः तयार न केलेले मेसेजेस "फॉरवर्ड केलेले" या लेबलसह प्रदर्शित केले जातील.