मीडिया फाइल्स कशा पाठवाव्यात

Android
iPhone
वेब आणि डेस्कटॉप
Windows
फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, स्टिकर्स किंवा संपर्क पाठवणे
 1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
 2. अटॅच करा
  किंवा
  वर क्लिक करा, त्यानंतर येथे क्लिक करा:
  • तुमच्या कॉंप्युटरवर असलेले फोटो किंवा व्हिडिओ निवडण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ
   वर क्लिक करा. तुम्ही एकावेळी कमाल ३० फोटो किंवा व्हिडिओ पाठवू शकता आणि प्रत्येक फोटो अथवा व्हिडिओला कॅप्शन जोडू शकता. किंवा, तुम्ही मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या जागेमध्ये फोटो किंवा व्हिडिओ थेट ड्रॅग करून ड्रॉप करू शकता. तुम्ही पाठवत असलेल्या प्रत्येक व्हिडिओ साइझची कमाल मर्यादा १६ MB इतकी आहे.
  • तुमच्या कॉंप्युटरचा कॅमेरा वापरून फोटो घेण्यासाठी कॅमेरा
   वर क्लिक करा.
  • तुमच्या कॉंप्युटरवरून डॉक्युमेंट्स निवडण्यासाठी डॉक्युमेंट
   वर क्लिक करा. किंवा तुम्ही मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या जागेमध्ये डॉक्युमेंट थेट ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता. तुम्ही जास्तीत जास्त २ GB साइझचे डॉक्युमेंट पाठवू शकता.
  • तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह केलेल्या संपर्कांची माहिती WhatsApp वर पाठवण्यासाठी संपर्क
   वर क्लिक करा.
 3. पाठवा
  किंवा
  वर क्लिक करा.
व्हॉइस मेसेज पाठवणे
 1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
 2. मायक्रोफोन
  वर किंवा
  वर क्लिक करा आणि तुमच्या कॉंप्युटरच्या मायक्रोफोनमध्ये बोलण्यास सुरुवात करा.
 3. बोलणे पूर्ण झाल्यावर व्हॉइस मेसेज पाठवण्यासाठी,
  वर क्लिक करा.
टीप: व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करताना, तुम्ही रेकॉर्डिंग तात्पुरते थांबवण्यासाठी थांबवा
वर आणि ते पुन्हा सुरू करण्यासाठी मायक्रोफोन
किंवा
वर क्लिक करू शकता. तुमचे रेकॉर्डिंग रद्द करण्यासाठी आणि हटवण्यासाठी,
वर क्लिक करा.
तुमच्या कॉंप्युटरवर फोटो किंवा व्हिडिओ सेव्ह करणे
 1. तुम्हाला सेव्ह करायचा आहे त्या फोटो किंवा व्हिडिओवर क्लिक करा.
 2. डाउनलोड करा
  किंवा
  वर क्लिक करा. सूचना दिसल्यास, सेव्ह करा वर क्लिक करा.
संबंधित लेख:
मीडिया फाइल्स कशा पाठवाव्यात: Android | iPhone | KaiOS
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही