‘क्लिक टू चॅट’ वापरणे

WhatsApp चे ‘क्लिक टू चॅट’ हे फीचर वापरून तुम्ही तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये नसलेल्या व्यक्तीसोबतही चॅट सुरू करू शकता. तुम्हाला त्या व्यक्तीचा फोन नंबर माहीत असेल आणि त्यांच्याकडे सुरू असलेले WhatsApp खाते असेल, तर तुम्ही एक लिंक तयार करून त्या व्यक्तीसोबत चॅट सुरू करू शकता. ही लिंक उघडल्यावर त्या व्यक्तीसोबतचे चॅट आपोआपच सुरू होते. ‘क्लिक टू चॅट’ हे फीचर फोन आणि WhatsApp वेब दोन्हीवर चालते.
स्वतःची लिंक तयार करणे
https://wa.me/<number> ही लिंक वापरा ज्यामध्ये <number> हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये असलेला फोन नंबर असतो. आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये फोन नंबर समाविष्ट करताना फोन नंबरमध्ये अतिरिक्त शून्य, कंस किंवा आडवी रेघ लावू नका.
उदाहरणार्थ:
असे वापरा: https://wa.me/1XXXXXXXXXX
असे वापरू नका: https://wa.me/+001-(XXX)XXXXXXX
तुमची स्वत:ची, आधीपासून लिहिलेला मजकूर असलेली लिंक तयार करणे
आधीपासून लिहीलेला तो मजकूर चॅटमधील मेसेज लिहीण्याच्या जागेमध्ये आपोआप दिसेल. https://wa.me/whatsappphonenumber?text=urlencodedtext ही लिंक वापरा ज्यामध्ये whatsappphonenumber हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये असलेला फोन नंबर असतो आणि urlencodedtext हा आधीपासून भरलेला URL-एन्कोडेड मेसेज असतो.
उदाहरणार्थ: https://wa.me/1XXXXXXXXXX?text=I'm%20interested%20in%20your%20car%20for%20sale
फक्त अगोदर पासून भरलेला मजकूर वापरून लिंक तयार करण्यासाठी, https://wa.me/?text=urlencodedtext वापरा
उदाहरणार्थ: https://wa.me/?text=I'm%20inquiring%20about%20the%20apartment%20listing`
लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या संपर्कांना मेसेज पाठवू शकता याची यादी दिसेल.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही