ब्रॉडकास्ट लिस्टचा वापर कसा करावा

Android
iPhone
ब्रॉडकास्ट लिस्ट हे फीचर वापरून तुम्ही एकाचवेळी अनेक संपर्कांना मेसेज पाठवू शकता. ब्रॉडकास्ट लिस्ट ही मेसेज प्राप्तकर्त्यांची यादी असते, ज्या यादीला तुम्ही वारंवार ब्रॉडकास्ट मेसेजेस पाठवू शकता. तुम्ही प्रत्येक वेळी प्राप्तकर्त्यांना निवडण्याची गरज नसते.
ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करण्यासाठी
 1. WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
  > नवीन ब्रॉडकास्ट यावर जा.
 2. तुम्हाला जो संपर्क समाविष्ट करायचा आहे, तो निवडा किंवा शोधा.
 3. बरोबरच्या खुणेवर
  टॅप करा.
यामुळे नवीन ब्रॉडकास्ट लिस्ट तयार होईल. तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये नवीन मेसेज पाठवता तेव्हा, तो तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमधील सर्व प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचतो. प्राप्तकर्त्यांना तो मेसेज नेहमीच्या मेसेजप्रमाणेच प्राप्त होईल. त्यांनी प्रत्युत्तर दिल्यावर, तो तुमच्या चॅट स्क्रीनवर नेहमीच्या मेसेजप्रमाणे दिसेल. ते उत्तर ब्रॉडकास्ट लिस्टमधील इतर प्राप्तकर्त्यांना पाठवले जाणार नाही.
टीप: ज्या संपर्कांनी तुमचा नंबर त्याच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह केला असेल त्यांनाच तुमचा ब्रॉडकास्ट मेसेज दिसेल. तुमच्या संपर्कांना तुमचे ब्रॉडकास्ट मेसेजेस मिळत नसतील तर त्यांनी तुमचा नंबर त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये समाविष्ट केला आहे याची खात्री करून घ्या. ब्रॉडकास्ट लिस्ट हे एका व्यक्तीने अनेकांशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. तुमचे प्राप्तकर्ते ग्रुपमध्ये संवाद साधू इच्छित असतील तर, तुम्ही ग्रुप चॅट तयार करणे आवश्यक आहे.
ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये बदल करण्यासाठी
 1. तुमची ब्रॉडकास्ट लिस्ट उघडा.
 2. अधिक पर्याय
  > ब्रॉडकास्ट लिस्ट माहिती यावर टॅप करा.
 3. ब्रॉडकास्ट लिस्ट माहिती स्क्रीनवर तुम्ही हे करू शकता:
  • संपादन
   वर टॅप करून ब्रॉडकास्ट लिस्टचे नाव बदलू शकता.
  • प्राप्तकर्ता जोडा...
   वर टॅप करून ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये प्राप्तकर्ते जोडू शकता.
  • प्राप्तकर्ते संपादित करा वर जाऊन तुम्हाला ज्या संपर्कांना हटवायचे आहे त्यांच्या नावाच्या बाजूला असलेल्या "x" वर टॅप करा आणि त्यानंतर बरोबरच्या खुणेवर
   टॅप करा.
ब्रॉडकास्ट लिस्ट हटवण्यासाठी
 1. तुम्हाला हटवायच्या असलेल्या ब्रॉडकास्ट लिस्टवर टॅप करून धरून ठेवा.
 2. ब्रॉडकास्ट लिस्ट हटवा
  > हटवा यावर टॅप करा. मीडिया फाइल्स हटवायच्या की नाही हे तुम्ही निवडू शकता.
तुम्ही असेही करू शकता, तुम्हाला हटवायची असलेली ब्रॉडकास्ट लिस्ट उघडा. त्यानंतर, ब्रॉडकास्ट लिस्टच्या नावावर किंवा वापरकर्त्यांच्या नावावर टॅप करून प्रसारण यादी हटवा > हटवा यावर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही