चॅटलिस्ट फिल्टर्स कसे जोडावेत

चॅटलिस्ट फिल्टर्स वापरून तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून मिळालेले किंवा तुम्ही त्यांना पाठवलेले विशिष्ट मेसेजेस तुमच्या चॅट लिस्टमध्ये झटपट शोधू शकता. चॅटलिस्ट फिल्टर्समुळे फोटो, GIF, लिंक्स आणि डॉक्युमेंट्स यांसारख्या गोष्टी शोधणे सोपे होते.
चॅटलिस्ट फिल्टर जोडणे
  1. WhatsApp Business अ‍ॅप उघडा > शोधा
    वर टॅप करा.
    • टीप: तुमच्याकडे iPhone डिव्हाइस असल्यास, तुम्हाला सर्वप्रथम चॅट्स स्क्रीनवर खाली स्वाइप करावे लागू शकते.
  2. तुम्हाला जो फिल्टर जोडायचा आहे तो ड्रॉपडाउन लिस्टमधून निवडा.
टीप: फिल्टर्स हटवता किंवा बदलता येत नाहीत.
बिझनेसशी संबंधित टीप: तुमचे ग्राहक तुम्हाला काही वेळा ते स्वतः प्रॉडक्ट्स वापरतानाचे फोटो पाठवू शकतात. असे फोटो सहजरीत्या शोधण्यासाठी, फोटो चॅटलिस्ट फिल्टर जोडा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही