बिझनेसचे नाव तयार करण्याविषयी माहिती

बिझनेसचे नाव हे त्या बिझनेसची अथवा संस्थेची ओळख दर्शवणारे असावे.
बिझनेसचे नाव तयार करण्यासाठीचे नियम
"अधिकृत बिझनेस खाते" म्हणून मान्यता मिळण्यासाठी नाव तयार करताना पुढील गोष्टींची काळजी घ्या:
  • नाव इंग्रजीमध्ये असल्यास, नावामधील सर्वच्या सर्व अक्षरे कॅपिटलमध्ये वापरू नका. संक्षेप वापरणार असाल, तर सर्व अक्षरे कॅपिटलमध्ये चालतील. प्रत्येक शब्दाचे फक्त पहिले अक्षर कॅपिटल लिहिले तर चालेल. उभयान्वयी अव्ययाचे पहिले अक्षर कॅपिटल असू नये. उदाहरणार्थ:
    • योग्य: Sweet Treats or Tammy's Burritos and Tacos
    • अयोग्य: SWEET TREATS* किंवा Tammy's Burritos And Tacos
  • शब्दांमध्ये अतिरिक्त रिकाम्या जागा असू नयेत. बिझनेसच्या नावामध्ये केवळ सिंगल स्पेस वापरावी.
  • गरज नसलेली विरामचिन्हे वापरू नयेत
  • इमोजी
  • चिन्हे (उदाहरणार्थ: ®) वापरू नयेत
  • एकापाठोपाठ येणारी अक्षरे ही अल्फा-न्यूमेरिक कॅरेक्टर्स (अक्षर किंवा अंक नाहीत अशी कॅरेक्टर्स) असू नयेत
  • पुढीलपैकी कोणतीही स्पेशल कॅरेक्टर्स वापरू नयेत: ~!@#$%^&*()_+:;"'{}[]\|<>,/?
टीप: ज्या बिझनेसचे नाव अगोदरपासून निश्चित आहे, अशा बिझनेससाठी हे नियम लागू असणार नाहीत. अशा वेळी WhatsApp Business ॲपमध्ये वापरलेल्या नावामध्ये बिझनेसच्या ब्रँडशी जुळण्यासाठी विरामचिन्हे, कॅपिटल अक्षरे इत्यादी असू शकतात.
तसेच, बिझनेस नावामध्ये खालील गोष्टीदेखील असू नयेत:
  • व्यक्तीचे संपूर्ण नाव
  • जेनेरिक अर्थात सर्वसाधारण संज्ञा (उदाहरणार्थ: फॅशन)
  • सामान्य भौगोलिक स्थान (उदाहरणार्थ: मुंबई)
  • तीन किंवा त्यापेक्षा कमी कॅरेक्टर्स
बिझनेसच्या नावामध्ये "WhatsApp" या शब्दाचे कोणतेही स्वरूप वापरलेले चालणार नाही. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, आमची ब्रॅंड मार्गदर्शकतत्त्वे पहा.
टीप: तुमचे बिझनेस खाते "अधिकृत बिझनेस खाते" असेल आणि जर तुम्ही बिझनेसचे नाव बदलले तर, तुम्ही तुमच्या खात्याचे "अधिकृत बिझनेस खाते" हे स्टेटस गमावू शकता.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही