चुकीच्या माहितीचा प्रसार कसा रोखावा
'फॉरवर्ड केलेले' या लेबलविषयी अधिक जाणून घ्या
एखादा मेसेज तुमच्या मित्राने किंवा कुटुंबीयाने स्वतः लिहिला आहे, की तो त्यांना दुसऱ्या कोणी पाठवलेला आहे, हे "फॉरवर्ड केलेले" या लेबलमुळे समजण्यास मदत होते. जेव्हा एखादा मेसेज पाच किंवा अधिक चॅट्समधून फॉरवर्ड होतो, तेव्हा त्याचा अर्थ मूळ लेखकाने मेसेज पाठवल्यापासून त्या मेसेजने किमान पाच चॅट्सचा प्रवास केलेला आहे, असा होतो. अशा मेसेजला दुहेरी बाणाचे चिन्ह
आणि "बऱ्याच वेळा फॉरवर्ड केलेले" असे लेबल लावले जाते. मूळ मेसेज कोणी लिहिला आहे याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास त्याची सत्यता पुन्हा तपासून पहा. फॉरवर्ड करण्याच्या मर्यादांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.

तुमचे पूर्वग्रह तपासा
तुमच्या पूर्वग्रहांना मान्यता दर्शवणारी माहिती असेल तर त्याकडे बारकाईने पहा; ती माहिती शेअर करण्याअगोदर तिची सत्यता पडताळून घ्या. अशक्य आणि अविश्वसनीय वाटणाऱ्या बातम्या शक्यतो खोट्याच असतात.
इतर स्रोतांद्वारे माहितीची सत्यता पडताळून पहा
खोट्या बातम्या अनेकदा व्हायरल होतात. फेरफार केलेले फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ यांमुळे तुमची दिशाभूल होऊ शकते. एखादा मेसेज अनेक वेळा शेअर केला म्हणून तो खरा ठरत नाही. तुम्हाला खोटी माहिती मिळाली, तर पाठवणाऱ्याला त्यांनी तुम्हाला चुकीची माहिती आहे असे कळवा आणि मेसेज शेअर करण्यापूर्वी तो पडताळून पाहण्याचा सल्ला द्या.
आलेला मेसेज खरा आहे की खोटा याबद्दल तुम्हाला खात्री नसेल, तर विश्वासार्ह वृत्तपत्रांच्या वेबसाइटवर जाऊन त्याविषयी माहिती मिळते का ते पहा. एखादी बातमी अनेक ठिकाणी प्रसारित केली गेली असेल आणि विश्वासार्ह स्रोतांमार्फत आली असेल, तर ती खरी असण्याची शक्यता अधिक असते. अधिक माहितीकरिता तुम्ही वस्तुस्थितीची पडताळणी करणाऱ्या संस्था किंवा तुमचा विश्वास असलेल्या लोकांचा सल्ला घेऊ शकता. वस्तुस्थितीची पडताळणी करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय सत्यता तपासणी नेटवर्कसोबत संलग्न असलेल्या संस्थांच्या यादीसाठी हा लेख पहा.
एखादा संपर्क सतत खोट्या बातम्या पाठवत असल्यास त्यांची तक्रार नोंदवा. मेसेज, संपर्क किंवा ग्रुपची तक्रार कशी नोंदवायची याविषयी अधिक माहिती हवी असल्यास हा लेख वाचा.
नेहमीपेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या मेसेजेसवर लक्ष ठेवा
तुम्हाला मिळणारे अनेक अनावश्यक मेसेजेस आणि लिंक्स यांमध्ये शब्दलेखनाच्या किंवा व्याकरणाच्या चुका असू शकतात किंवा ते तुम्हाला वैयक्तिक माहिती शेअर करायला सांगतात. अशा प्रकारचे मेसेजेस कसे ओळखावेत आणि हाताळावेत, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
टीप: एखादी व्यक्ती भावनिक किंवा शारीरिक अत्याचारास बळी पडत आहे असे तुमच्या असे लक्षात आले, तर कृपया नजीकच्या कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकारी याविषयी मदत करण्यासाठी तत्पर असतात.
संबंधित लेख: