कॅटलॉग तयार करणे आणि तो मेन्टेन करणे

वेब आणि डेस्कटॉप
Android
iPhone
कॅटलॉग अपडेट केलेला असेल तर तुमच्या ग्राहकांना तुमच्याशी बिझनेस करणे अधिक सोपे होते. यामुळे तुमची नवी प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात मदत होते.
प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जोडणे
तुमच्या कॅटलॉगमध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जोडण्यासाठी:
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. तुमच्या चॅट लिस्टच्या सर्वात वर असलेल्या आणखी
  |
  > कॅटलॉग यावर क्लिक करा.
 3. नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जोडा वर क्लिक करा.
 4. तुमच्या फाइल्समधून इमेजेस अपलोड करण्यासाठी इमेजेस जोडा वर क्लिक करा. तुम्ही कमाल १० इमेजेस अपलोड करू शकता.
 5. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसला नाव द्या. तुम्ही अपलोड केलेल्या प्रॉडक्टची किंमत, वर्णन, लिंक आणि प्रॉडक्ट कोड यासारखे पर्यायी तपशीलदेखील देऊ शकता.
 6. तुमच्या कॅटलॉगमध्ये प्रॉडक्ट जोडण्यासाठी कॅटलॉगमध्ये जोडा वर क्लिक करा.
टीप: कॅटलॉगमध्ये किमती जोडण्याची सुविधा फक्त ठरावीक देशांमध्ये उपलब्ध आहे.
ग्राहक कोणती प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस बघू शकतात ते नियंत्रित करणे
टीप: हे वैशिष्ट्य तुमच्यासाठी अद्याप उपलब्ध नसू शकते.
कॅटलॉगमधील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लपवणे
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. तुमच्या चॅट लिस्टच्या सर्वात वर असलेल्या आणखी
  |
  > कॅटलॉग यावर क्लिक करा.
 3. तुम्हाला लपवायचे आहे अशा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर क्लिक करा > संपादन वर क्लिक करा.
 4. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लपवा निवडा.
 5. सेव्ह करा वर क्लिक करा.
किंवा, कॅटलॉग स्क्रीनवरील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर माउस फिरवा. त्यानंतर, आणखी
|
> प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लपवा यावर क्लिक करा.
तरीदेखील, लपवलेली प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस तुमच्या कॅटलॉग मॅनेजरमध्ये त्यांच्या इमेजवर
या चिन्हासह दिसतील. प्रॉडक्ट तपशील पेज उघडल्यावर, तुम्ही हे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लपवली आहे हे दर्शवणारी टीप दिसेल.
कॅटलॉगमधील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लपवणे बंद करणे
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. तुमच्या चॅट लिस्टच्या सर्वात वर असलेल्या आणखी
  |
  > कॅटलॉग यावर क्लिक करा.
 3. तुम्हाला लपवणे बंद करायचे आहे अशा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर क्लिक करा > संपादन यावर क्लिक करा.
 4. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लपवा ची निवड रद्द करा.
 5. सेव्ह करा वर क्लिक करा.
किंवा, कॅटलॉग स्क्रीनवरील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर माउस फिरवा. त्यानंतर, आणखी
|
> प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस दाखवा यावर क्लिक करा.
प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस हटवणे
तुमच्या कॅटलॉगमधून प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस हटवण्यासाठी:
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. तुमच्या चॅट लिस्टच्या सर्वात वर असलेल्या आणखी
  |
  > कॅटलॉग यावर क्लिक करा.
 3. तुम्हाला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस यापैकी जे हटवायचे आहे, जे निवडा.
 4. प्रॉडक्ट तपशील विभागाच्या तळापर्यंत स्क्रोल करा.
 5. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस हटवा वर क्लिक करा.
 6. ठीक आहे वर क्लिक करा.
टीप: कॅटलॉगवर अपलोड केलेल्या प्रत्येक इमेजचे पुनरावलोकन केले जाते. पुनरावलोकनामुळे इमेज, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस WhatsApp कॉमर्स धोरणाचे पालन करत असल्याची खात्री होते.
तुमच्या कॅटलॉगमधील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस नाकारली गेली तर, इमेजच्या बाजूला लाल उद्गारवाचक चिन्ह दिसेल. ते बरोबर नाही असे तुम्हाला वाटल्यास आणि तुम्हाला दुसऱ्या‍ पुनरावलोकनाची विनंती करायची असल्यास हे करा:
 • तपशील पाहण्यासाठी, नाकारलेले प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस निवडा.
 • दुसऱ्या पुनरावलोकनाची विनंती करा वर क्लिक करा.
 • मजकूर लिहिण्याच्या जागी तुम्ही ही विनंती का करत आहात याचे कारण लिहा.
 • सुरू ठेवा वर क्लिक करा.
टीप: तुमचे WhatsApp Business खाते Facebook शॉपला लिंक केलेले असेल आणि तुम्ही विक्री चॅनेल म्हणून WhatsApp सुरू केले, तर तुमच्या WhatsApp कॅटलॉगच्या जागी बाय डिफॉल्ट तुमचे Facebook शॉप येईल. यामुळे तुमचा WhatsApp कॅटलॉग हटवला किंवा बदलला जाणार नाही, परंतु तुम्ही आणि तुमचे ग्राहक तो पाहू शकणार नाही. तुम्ही विक्री चॅनेल म्हणून WhatsApp बंद करून कोणत्याही क्षणी तुमच्या WhatsApp कॅटलॉगवर परत जाऊ शकता. 'कॉमर्स मॅनेजर' मध्ये तुमचे विक्री चॅनेल कसे व्यवस्थापित करावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही