Google ड्राइव्ह बॅकअप्सविषयी माहिती

Android
Google ड्राइव्ह हा तुमचा WhatsApp डेटा नवीन फोनवर ट्रान्सफर करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. Google ड्राइव्ह हे Google द्वारे देऊ केलेले, विकसित केलेले आणि ऑपरेट केले जाणारे ॲप आहे. बॅकअप फाइल्स आकाराने वेगवेगळ्या असू शकतात आणि त्यांमुळे मोबाइल डेटा वापरला जाऊन अतिरिक्त शुल्क लागू शकते हे पाहता, तुमच्या चॅटचा Google ड्राइव्हवर बॅकअप घेण्यापूर्वी तुम्ही तुमचा फोन वाय-फायला कनेक्ट करावा अशी आम्ही शिफारस करतो. तुमचा डेटा हटवला जाण्याचा धोका टाळण्यासाठी १९ एप्रिल २०२२ पासून तुम्ही दर ५ महिन्यांनी Google ड्राइव्हवर बॅकअप घेणे आवश्यक असेल.
टीप:
  • WhatsApp बॅकअप्सची गणना तुमच्या Google ड्राइव्ह स्टोरेज कोट्यामध्ये होत नाही.
  • WhatsApp बॅकअप्स हे ज्या फोन नंबरवर आणि Google खात्यावर तयार करण्यात आले होते, त्या फोन नंबरशी आणि खात्याशी संलग्न असतात.
  • ५ महिने अपडेट न केलेले WhatsApp बॅकअप्स Google द्वारे आपोआप हटवले जाऊ शकतात. बॅकअप्स हटवले जाण्याचा धोका टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या WhatsApp डेटाचा पुष्कळदा बॅकअप घ्यावा अशी आम्ही शिफारस करतो.
  • पहिला बॅकअप पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचा फोन चार्जिंगला लावून ठेवावा अशी आम्ही शिफारस करतो.
  • तुम्ही एकच Google खाते वापरून Google ड्राइव्हचा बॅकअप तयार करता, तेव्हा त्या खात्यावरून तयार केलेला मागील बॅकअप Google द्वारे ओव्हरराइट केला जातो. जुना Google ड्राइव्ह बॅकअप रिस्टोअर करण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही.
  • तुम्ही ज्या मीडिया फाइल्स आणि मेसेजेसचा बॅकअप घेत आहात, ते WhatsApp च्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित नसतात. त्यांना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित करण्यासाठी तुम्ही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित बॅकअप्स सुरू करणे आवश्यक असेल.
अपडेट्स तपासण्यासाठी कृपया मदत केंद्रातील हा लेख पहा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही