कॅटलॉगविषयी माहिती

WhatsApp Business ॲप वापरणारे वापरकर्ते त्यांच्या बिझनेस प्रोफाइलमध्ये प्रदर्शित केला जाणारा कॅटलॉग तयार करून ग्राहकांसोबत त्यांची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस शेअर करू शकतात.
कॅटलॉगमधील प्रत्येक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसला युनिक शीर्षक असते आणि त्यामध्ये खालील पर्यायी माहिती असू शकते:
  • किंमत
  • वर्णन
  • वेबसाइटची लिंक
  • प्रॉडक्ट कोड
या तपशिलांमुळे ग्राहकांना कॅटलॉगमधील त्यांना हवी असलेली प्रॉडक्ट्स मिळवता येतात. कॅटलॉगमध्ये कमाल ५०० प्रॉडक्ट्स असू शकतात.
कॅटलॉग अप-टू-डेट असेल, तर ग्राहकांना तुमच्या प्रॉडक्ट्सची आणि सर्व्हिसेसची माहिती मिळून तुमच्या बिझनेसशी कनेक्ट करणे सोपे होते. ग्राहक त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅटलॉग प्रॉडक्ट्स शेअर करू शकतात किंवा प्रश्न विचारण्यासाठी बिझनेसला मेसेज करू शकतात.
बिझनेससंबंधित टीप: तुमच्या प्रॉडक्ट्सचा आणि सर्व्हिसेसचा कॅटलॉग नियमितपणे अपडेट केल्याने तुमच्या बिझनेसमधील ग्राहकांचा रस आणि ग्राहक टिकून राहण्यात मदत होऊ शकते.
कॅटलॉग शेअर करण्याच्या सुविधेमुळे छोट्या बिझनेसना त्यांचा कॅटलॉग प्रमोट करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतो. WhatsApp Business वापरकर्ते त्यांच्याशी बिझनेसच्या संदर्भात संपर्क साधणाऱ्या ग्राहकांना त्यांचा संपूर्ण कॅटलॉग पाठवू शकतात. याचप्रमाणे, ते त्यांच्या कॅटलॉगची लिंक सोशल मीडियावर तसेच इतर प्लॅटफॉर्म्सवर कुठेही शेअर करू शकतात. यामुळे अधिकाधिक लोकांना त्यांच्या बिझनेसविषयी माहिती मिळते आणि प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसमध्ये रस असलेल्या लोकांना त्यांच्याशी मेसेजच्या माध्यमातून थेट संपर्क साधता येतो.
टीप: कॅटलॉगमध्ये किमती जोडण्याची सुविधा फक्त ठरावीक देशांमध्ये उपलब्ध आहे.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही