WhatsApp वर खाजगी आणि सुरक्षित समुदाय तयार करत आहोत

आम्ही आपली संभाषणे सुव्यवस्थित आणि व्यवस्थापित करण्यासाठी अधिक साधनांची गरज असलेल्या आणि सौहार्दपूर्ण संबंध असलेल्या WhatsApp वरील ग्रुप्ससाठी कम्युनिटी बनवत आहोत. अशा प्रकारच्या ग्रुप्समधील लोकांमध्ये एक नाते असते व त्यांची एकमेकांशी असलेली ओळख ही एखादे समान ठिकाण किंवा आवड याभोवती गुंफलेली असते.
शाळेतील पालक, स्थानिक क्लब्ज, किंवा छोटी कार्यालये ही आता लोकांना अपडेटेड ठेवण्यासाठी WhatsApp चा अवलंब करत आहेत. या ग्रुप्सना सोशल मीडियापेक्षा वेगळ्या, पण ईमेल किंवा केवळ ब्रॉडकास्ट चॅनलपलीकडेही रिअल-टाईम संभाषण सुकर करणारी अधिक साधने पुरविणाऱ्या संपर्क साधण्याच्या खाजगी मार्गांची गरज आहे.
WhatsApp वरील प्रत्येक कम्युनिटीच्या केंद्रस्थानी सामील होण्यासाठी लोकांना निवड करता येईल अशाप्रकारे ग्रुप्सची माहिती आणि मेनू दिलेला आहे. यामुळे लोकांना, त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असणार्‍या विषयांवर लक्ष केंद्रित करता येणे शक्य व्हावे म्हणून अधिक मोठ्या आणि अधिक संमिश्र ग्रुप्समधील संभाषणांना एक रचना आणि व्यवस्थापन देता येते. पुढील मार्गदर्शक तत्वे अनुसरून आम्ही या ग्रुप्सना WhatsApp वर खाजगी आणि सुरक्षित पद्धतीने संवाद साधता यावा यासाठी काही अपडेट्स तयार करत आहोत.
अ‍ॅडमिनला अधिक सक्षम बनवणे
अ‍ॅडमिन्सना त्यांच्या खाजगी ग्रुप्समधील संभाषणे व्यवस्थापित करता यावीत यासाठी आम्ही नवीन साधने तयार करत आहोत. WhatsApp वर कम्युनिटीज तयार करणे आणि व्यवस्थापित करणे यासाठी अ‍ॅडमिन जबाबदार असतील. कोणते ग्रुप्स त्यांच्या कम्युनिटीचा भाग बनतील याची निवड करण्यासाठी ते नवीन ग्रुप्स बनवू शकतील किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या ग्रुप्सना लिंक करू शकतील. कम्युनिटी अ‍ॅडमिन्स त्यांच्या कम्युनिटीमधून ग्रुप्स अनलिंकदेखील करू शकतील, तसेच वैयक्तिक सदस्यांना कम्युनिटीमधून पूर्णपणे काढून टाकू शकतील. याचबरोबर, ग्रुप ॲडमिन्स ग्रुपमधील सर्व सदस्यांकरिता अनुचित किंवा अपमानास्पद अशी चॅट्स किंवा मीडियादेखील हटवू शकतील. ही नवीन फीचर्स उत्तम पद्धतीने वापरता येता यावीत म्हणून आम्ही अ‍ॅडमिन्सना काही संसाधने पुरवू.
वापरकर्त्यांना त्यांच्या चॅटवर अधिक नियंत्रण देणे
अ‍ॅडमिन्सना नवीन साधने देण्यासोबतच, वापरकर्ते कम्युनिटीजमधील त्यांची इंटरअ‍ॅक्शन्स नियंत्रित करू शकतील. आमची सध्याची सेटिंग्ज वापरकर्त्यांना, त्यांना एखाद्या ग्रुपमध्ये कोण जोडू शकते हे ठरवू देतात – आणि हीच सेटिंग्ज कम्युनिटीजनादेखील लागू होतील. वापरकर्त्यांना सोप्या रीतीने गैरवर्तनाची तक्रार करता येईल, खाती ब्लॉक करता येतील आणि नको असलेल्या कम्युनिटीजमधून बाहेर पडता येईल. आम्ही कोणत्याही अधिसूचनेशिवाय ग्रुप सोडण्याचा पर्यायदेखील जोडत आहोत, जेणेकरून नको असलेल्या एखाद्या संभाषणातून बाहेर पडताना ग्रुपमधील प्रत्येकाला त्याची सूचना मिळणार नाही.
आकार, शोधयोग्यता आणि फॉरवर्ड करण्यावर योग्य मर्यादा
इतर ॲप्स कोणत्याही मर्यादा नसलेली ग्रुप चॅट्स देत असली, तरीही WhatsApp ने संस्था आणि एकमेकांना आधीपासून ओळखत असलेल्या लोकांचे इतर ग्रुप्स यांच्या गरजांना साजेसे प्रॉडक्ट विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मीडिया आणि इतर मेसेजिंग सर्व्हिसेसप्रमाणे, WhatsApp आपल्या सर्व्हिसवर नवीन कम्युनिटीजना शोधण्याची क्षमता उपलब्ध करून देणार नाही.
गोंधळ आणि ओव्हरलोड मर्यादित करण्यासाठी, केवळ कम्युनिटी अ‍ॅडमिन्स कम्युनिटीच्या सर्व सदस्यांना मेसेजेस पाठवू शकतील - ह्याला कम्युनिटीसाठी घोषणा ग्रुप असे म्हणतात. सुरुवातीला आम्ही हजारो वापरकर्त्यांसाठी कम्युनिटी घोषणांना सपोर्ट देऊ. कम्युनिटीतील सदस्य, अ‍ॅडमिन्सनी तयार केलेल्या किंवा मंजुरी दिलेल्या लहान ग्रुप्समध्ये चॅट करू शकतील. भविष्यात अ‍ॅडमिन्स आणि वापरकर्त्यांना अधिक नियंत्रण देण्यासोबतच, आम्ही ग्रुपच्या आकारांमध्येही वाढ करण्याचे नियोजन करत आहोत.
संभाषणे खाजगी ठेवण्यासाठी WhatsApp वरील फॉरवर्ड करण्याबाबतचे प्रतिबंध तसेच ठेवले जातील. कम्युनिटीज आल्यामुळे आता, आधीच फॉरवर्ड केले गेलेले मेसेजेस, सध्याची फॉरवर्ड मर्यादा असलेल्या पाचऐवजी, एकावेळी एकाच ग्रुपला पाठवले जाऊ शकतील. आम्हाला विश्वास आहे, की यामुळे कम्युनिटी ग्रुप्समध्ये संभाव्य चुकीच्या माहितीचा प्रसार परिणामकारकरीत्या रोखला जाऊ शकतो.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि फोन नंबर गोपनीयता
या सौहार्दपूर्ण संबंध असलेल्या कम्युनिटीजमधील चॅट्सचे स्वरूप बघता, WhatsApp या मेसेजेसना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित करेल, ज्यामुळे केवळ संबंधित ग्रुप्समधील सदस्यांव्यतिरिक्त इतर व्यक्ती ते मेसेजेस पाहू शकणार नाहीत. हे सुरक्षा तंत्रज्ञान विविध संस्था, कार्यस्थाने आणि वैयक्तिक ग्रुप्समधील संवेदनशील संभाषणांना सुरक्षित ठेवते.
वापरकर्त्याची गोपनीयता जपण्यासाठी तुमचा फोन नंबर कम्युनिटीपासून लपवून ठेवला जाईल आणि केवळ कम्युनिटी अ‍ॅडमिन्स व तुमच्यासोबत ग्रुपमध्ये असलेले इतर सदस्य यांनाच तो पाहता येईल. यामुळे नको असलेले संपर्क आणि लोकांच्या फोन नंबर्सचा गैरवापर टाळण्यास मदत होईल.
गैरवर्तन करणाऱ्या कम्युनिटीजविरुद्ध कारवाई करणे
हे नवीन उपाय आणि नियंत्रणे कम्युनिटी अ‍ॅडमिन्सना ते जवळून ओळखत असलेल्या त्यांच्या ग्रुप्समधील समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम करण्याच्या हेतूने तयार केली गेली आहेत. आम्ही यापुढेही वापरकर्त्यांना आक्षेपार्ह कम्युनिटीज आणि मेसेजेसबद्दल आमच्याकडे थेट तक्रार करण्यासाठी प्रोत्साहन देत राहू.
कम्युनिटीजकडून बाल लैंगिक शोषण सामग्रीचे वितरण किंवा हिंसा अथवा मानवी तस्करीचा समन्वय यांसारख्या आक्षेपार्ह कृती केल्या जात असल्याचे आढळून आल्यास, WhatsApp कडून, कम्युनिटीच्या वैयक्तिक सदस्यांना बॅन केले जाईल, कम्युनिटीचे विघटन केले जाईल, किंवा कम्युनिटीमधील सर्वच सदस्यांना बॅन केले जाईल. आम्ही योग्य कारवाई करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व एन्क्रिप्ट न केलेल्या माहितीचा आधार घेऊ, ज्यामध्ये कम्युनिटीचे नाव, वर्णन आणि वापरकर्त्याचा रिपोर्ट इत्यादींचा समावेश असेल.
WhatsAppला लोकांना खाजगीरीत्या आणि सुरक्षितपणे कनेक्ट करण्यास कशी मदत करता येईल याविषयीचे वापरकर्त्यांचे अभिप्राय विचारात घेऊन आम्ही येत्या काळामध्ये कम्युनिटीजसाठी सपोर्ट तयार करणे सुरू ठेवू.
हे मदतीचे होते का?
होय
नाही