बिझनेसेससोबत चॅट करत असताना शॉपिंग कशी करावी

काही बिझनेसेस ग्राहकांसोबत चॅट करत असताना त्यांच्या कॅटलॉगमधील ग्राहकांच्या विनंतीशी जुळणाऱ्या कमाल ३० निवडक प्रॉडक्ट्सची सूची शेअर करतात. यामुळे इच्छित प्रॉडक्ट शोधणे ग्राहकांकरिता सोपे होऊ शकते.
बिझनेसेससोबत चॅट करत असताना शॉपिंग करणे
 1. WhatsApp उघडा.
 2. चॅट टॅबवर जा > बिझनेससोबतच्या चॅटवर टॅप करा.
 3. बिझनेसचा संपूर्ण कॅटलॉग ॲक्सेस करण्यासाठी किंवा तुम्ही कोणते प्रॉडक्ट शोधत आहात हे बिझनेसला कळवण्यासाठी मेसेज पाठवायचा असल्यास, तुम्ही बिझनेसच्या नावासमोरील शॉपिंग बटण चिन्हावर (
  किंवा
  ) टॅप करू शकता.
  1. चॅटमध्ये तुमचा मेसेज लिहा. पाठवा
   वर टॅप करा.
  2. एखादा बिझनेस सूचींचा पर्याय वापरत असल्यास, ते तुमच्या विनंतीशी जुळणाऱ्या संभाव्य प्रॉडक्ट्सची सूची शेअर करू शकतात. सूचीवर टॅप करा.
 4. कॅटलॉग किंवा सूचीमधून तुमच्या कार्टमध्ये प्रॉडक्ट जोडण्यासाठी प्रॉडक्टच्या पुढे असलेल्या प्रॉडक्ट जोडा
  वर टॅप करा. प्रॉडक्टच्या माहितीचे पेज उघडण्यासाठी तुम्ही त्या प्रॉडक्टवर टॅपदेखील करू शकता. त्यानंतर, कार्टमध्ये जोडा वर टॅप करा.
  • तुमच्या कार्टमध्ये एखाद्या प्रॉडक्टचे नग कमीजास्त करण्यासाठी प्रॉडक्ट जोडा
   किंवा प्रॉडक्ट काढा
   वर टॅप करा.
 5. कार्ट पहा किंवा कार्ट चिन्हावर (
  किंवा
  ) वर टॅप करा.
 6. तुम्हाला तुमच्या कार्टसोबत एखादी तळटीप जोडायची असल्यास, मेसेज जोडा वर टॅप करा. त्यानंतर, बिझनेसला पाठवा
  वर टॅप करा.
बिझनेसकडे तुमची कार्ट ऑर्डर पोहोचल्यानंतर, ते तुमच्या पेमेंट पर्यायांविषयी चर्चा करतील.
संबंधित लेख:
WhatsApp वर शॉपिंग करण्याविषयी माहिती
हे मदतीचे होते का?
होय
नाही