आम्ही युरोपियन प्रदेशातील लोकांसाठी आमचे गोपनीयता धोरण अपडेट करत आहोत

आम्ही 'आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशन' या आमच्या आघाडीच्या युरोपियन डेटा संरक्षण नियामकाच्या निर्देशांनुसार आमच्या वापरकर्त्यांसाठी आमचे गोपनीयता धोरण अपडेट करत आहोत.
लक्षात घ्या, की तुमची वैयक्तिक संभाषणे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेली असल्याने आम्ही ती वाचू अथवा ऐकू शकत नाही आणि हे कधीही बदलणार नाही.

आमच्या वापरकर्त्यांना त्यांची गोपनीयता सर्वात महत्त्वाची वाटते हे आम्हाला माहीत आहे, म्हणूनच आम्ही अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो: या अपडेटमुळे आम्ही तुमच्या डेटावर प्रक्रिया कशी करतो, तो कसा वापरतो किंवा Meta या आमच्या मूळ कंपनीप्रमाणेच इतर कोणाहीसोबत तो डेटा कसा शेअर करतो यांसारख्या सर्व्हिसेस चालवण्याच्या आमच्या पद्धतींमध्ये बदल होणार नाहीत.
त्याऐवजी, आम्ही आमचे गोपनीयता धोरण अधिक चांगल्या पद्धतीने आयोजित केले आहे आणि त्यात अतिरिक्त माहितीची भर घातली आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
  • आम्ही डेटा कसा वापरतो: आम्ही डेटा कसा गोळा करतो आणि वापरतो, तुमचा डेटा का स्टोअर करतो आणि तो कधी हटवतो व तृतीय पक्ष आम्हाला कोणत्या सर्व्हिसेस प्रदान करतात यांबद्दल आम्ही अधिक तपशील जोडले आहेत.
  • आमची जागतिक ऑपरेशन्स: जागतिक स्तरावरील आमच्या सर्व्हिसेस प्रदान करण्यासाठी आम्ही देशविदेशांमध्ये डेटा का शेअर करतो आणि तो डेटा कसा संरक्षित करतो यांबद्दल आम्ही अधिक तपशील जोडले आहेत.
  • प्रक्रियेसाठी आमची कायदेशीर नियमावली: तुमच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही ज्या कायदेशीर नियमावलीवर अवलंबून आहोत, त्या नियमावलीविषयी आम्ही अधिक तपशील जोडले आहेत.
तुम्ही यापुढेही WhatsApp वापरण्याचा आनंद घेत राहाल अशी आम्हाला आशा वाटते.
हे मदतीचे होते का?
होय
नाही