संशयास्पद लिंक्सविषयी माहिती

Android
iPhone
वेब आणि डेस्कटॉप
तुम्हाला चॅटमध्ये मिळालेल्या काही लिंक्सवर संशयास्पद लिंकचे चिन्ह दिसू शकते.
लिंकमध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या वर्णांची रचना असते, तेव्हा हे चिन्ह दिसू शकते. अशा लिंक्स साइटच्या खऱ्याखुऱ्या लिंक्स आहेत असे भासवण्यात येते, पण प्रत्यक्षात त्या नको असलेल्या साइटवर नेणाऱ्या लिंक्स असतात. तुम्हाला अशा लिंक्सवर टॅप करायला लावण्यासाठी स्पॅमर्स अशा वर्णरचना वापरू शकतात.
संशयास्पद लिंकचे एक उदाहरण खालीलप्रमाणे आहे:
https://ẉhatsapp.com/free-tickets
टीप: पहिला वर्ण "w" अक्षरासारखा दिसतो, पण तो प्रत्यक्षात "ẉ" वर्ण आहे. याचा अर्थ असा आहे, की स्पॅमरने तुम्हाला फसवून प्रत्यक्षात WhatsApp शी संबंधित नसलेल्या वेबसाइटवर नेले आहे.
लिंक्स मिळाल्यानंतर त्यांमधील मजकूर काळजीपूर्वक तपासा. लिंकवर संशयास्पद लिंकचे चिन्ह असेल, तर त्या लिंकवर टॅप केल्यास पॉप-अप मेसेज दिसेल, जो त्या लिंकमधील वेगळे वर्ण हायलाइट करेल. त्यानंतर तुम्ही लिंक उघडायची की चॅटवर परत जायचे हे ठरवू शकता.
लिंक संशयास्पद आहे की नाही हे ठरवण्यासाठी WhatsApp आपोआप तपासणी करते. तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी या तपासण्या पूर्णपणे तुमच्या डिव्हाइसवर घडतात, तसेच एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन मुळे WhatsApp तुमच्या मेसेजेसमधील आशय पाहू शकत नाही.
WhatsApp वर सुरक्षित कसे रहावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही