WhatsApp वेब आणि डेस्कटॉप अपडेट्सविषयी माहिती

आम्ही WhatsApp वेब आणि डेस्कटॉपची नवीन आवृत्ती उपलब्ध करून देत आहोत. या अपडेटनंतर तुम्ही एकाच वेळी चार लिंक केलेल्या डिव्हाइसेसवर WhatsApp वापरू शकता. त्यासाठी तुमचा फोन ऑनलाइन असणे आवश्यक नसेल. WhatsApp वापरणाऱ्या लोकांना माहीत आहे त्याप्रमाणे प्रत्येक डिव्‍हाइस एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनद्वारे गोपनीयता व सुरक्षेची समान पातळी राखून WhatsApp शी स्‍वतंत्रपणे कनेक्‍ट होईल. हे बदल जानेवारीमध्ये वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. हे बदल मार्चमध्ये सर्व iOS वापरकर्त्यांसाठी व एप्रिलमध्ये Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले जातील.
आम्हाला अजून बरेच काही करता येऊ शकेल असा आमच्या वापरकर्त्यांचा फीडबॅक आहे. काही वापरकर्त्यांना WhatsApp वेब आणि डेस्कटॉपवर मेसेजेस सुरक्षितपणे लोड करताना विलंब होत आहे आम्हाला याची जाणीव आहे. लिंक केलेल्या डिव्हाइसेसवर अनुभव जलद आणि अधिक विश्वासार्ह व्हावा यासाठी आम्ही अनेक सुधारणांवर काम करत आहोत.
WhatsApp वेबवरील लिंक पूर्वावलोकन, लिंक केलेल्या डिव्हाइसेसवर लाइव्ह लोकेशन पाहणे, हटवलेली चॅट्स सर्व डिव्हाइसेसवर आणखी चांगल्या पद्धतीने सिंक करणे, ब्रॉडकास्‍ट लिस्ट्स, तुमच्‍या स्वतःच्या नंबरवर मेसेजेस पाठवणे आणि प्राप्त करणे व तुमच्या फोनवरून तुमच्या लिंक केलेल्या डिव्हाइसेसवर स्टिकर संग्रह सिंक करणे अशी काही फीचर्स वापरकर्त्‍यांना उपलब्ध नाहीत याचीही आम्‍हाला जाणीव आहे. आम्ही यांतील जास्तीत जास्त फीचर्स पूर्वपदाला आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
WhatsApp वेब आणि डेस्कटॉपमध्ये सुधारणा करण्यासाठी आमचे अथक प्रयत्न सुरू आहेत. आमच्या या कामाबद्दल फीडबॅक शेअर करणाऱ्या प्रत्येकाचे आभार.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही