ऑटो-डाउनलोड कसे कॉन्फिगर करावे

Android
iPhone
तुम्हाला तुमच्या नवीन फोटोंचा त्वरित ॲक्सेस मिळावा यासाठी WhatsApp बाय डीफॉल्ट मोबाइल इंटरनेटच्या मदतीने तुमच्या इमेजेस आपोआप डाउनलोड करते.

फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ आपोआप डाउनलोड व्हावेत यासाठी WhatsApp वर जा आणि अधिक पर्याय
> सेटिंग्ज > स्टोरेज आणि डेटा > मीडिया ऑटो-डाउनलोड यावर टॅप करा.
WhatsApp ने मीडिया फाइल्स आपोआप कधी डाउनलोड कराव्यात हे तुम्ही इथे निवडू शकता.
लक्षात ठेवा: कोरोना व्हायरसच्या (COVID-19) साथीमध्ये WhatsApp इतर सर्व्हिसेसची मदत घेणार आहे ज्यामुळे मोबाइल नेटवर्क ट्रॅफिक कमी होण्यास मदत होईल. मोबाइल नेटवर्क बॅंडविड्थच्या समस्येत सुधारणा व्हावी म्हणून आम्ही काही प्रदेशांमध्ये डॉक्युमेंट्स, व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेजेसकरिता ऑटो-डाउनलोड बंद केले आहे.
जेव्हा मोबाइल इंटरनेट वापरता तेव्हा
तुम्ही मोबाइल इंटरनेटशी जोडलेले असता तेव्हा, निवडलेल्या मीडिया फाइल्स आपोआप डाउनलोड होतात.
जेव्हा वाय-फाय वापरता तेव्हा
तुम्ही वाय-फायशी जोडलेले असता तेव्हा, निवडलेल्या मीडिया फाइल्स आपोआप डाउनलोड होतात.
जेव्हा रोमिंगमध्ये असता तेव्हा
तुम्ही रोमिंगमध्ये असता तेव्हा, निवडलेल्या मीडिया फाइल्स आपोआप डाउनलोड होतात.
लक्षात ठेवा: तुम्ही रोमिंगमध्ये असताना ऑटो-डाउनलोड सुरू ठेवले असेल तर, तुमचा मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर त्यावर वाढीव शुल्क आकारू शकतो, कारण रोमिंगमध्ये मोबाइल इंटरनेट वापरणे हे शक्यतो महागच असते.
तुम्ही डाउनलोड केलेल्या मीडिया फाइल्स तुमच्या गॅलरीमध्ये आपोआप दिसतात. तुम्हाला WhatsApp मध्ये येणाऱ्या सर्व मीडिया फाइल्स तुमच्या गॅलरीमध्ये दिसायला नको असतील तर, आम्ही अशी शिफारस करतो की, तुम्ही तुमच्या WhatsApp इमेजेस, ऑडिओ आणि व्हिडिओ फोल्डरमध्ये .nomedia फाइल किंवा फोल्डर तयार करा. तुम्ही हे Google Play स्टोअर वरून फाइल एक्सप्लोरर वापरून करू शकता. नंतर विचार बदललाच तर फक्त .nomedia फाइल हटवा आणि सर्व मीडिया फाइल्स पुन्हा एकदा तुमच्या गॅलरीमध्ये दिसायला लागतील.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्मवर ऑटो-डाउनलोड कसे कॉन्फिगर करावे: iPhone
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही