माझ्या WhatsApp वर आलेला मीडिया माझ्या फोन गॅलरीमध्ये साठविण्यापासून कसा थांबविता येईल?

जेव्हा तुम्ही मीडिया फाईल डाउनलोड करता तेव्हा ती तुमच्या फोनच्या मूलभूत स्टोरेजमध्ये साठवली जाते. मीडिया दिसू शकणे हा पर्याय मूलभूतरीत्या चालू वर सेट केलेला असतो. 'मीडिया दिसू शकणे' हे फीचर हे केवळ नव्याने डाउनलोड होणाऱ्या मीडियासाठी लागू असते आणि ते जुन्या मीडियाला लागू होत नाही.
तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये तुमच्या वैयक्तिक चॅट आणि ग्रुप चॅट मधील मीडिया साठवायचा नसेल तर यासाठी हे करा
 1. WhatsApp उघडा.
 2. अधिक पर्याय
  > सेटिंग्ज > चॅट
  येथे टॅप करा.
 3. 'मीडिया दिसू शकणे' बंद करा.
एखाद्या विशिष्ट वैयक्तिक चॅट मधून किंवा ग्रुप्स मधून येणारे मीडिया साठविणे थांबविण्यासाठी हे करा
 1. वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप उघडा.
 2. अधिक पर्याय
  > संपर्क पहा किंवा ग्रुप माहिती हे टॅप करा.
  • तुम्ही असेही करू शकता, संपर्काचे नाव किंवा ग्रुप चॅटच्या नावावर टॅप करा.
 3. 'मीडिया दिसू शकणे' > नाही > ठीक आहे वर टॅप करा.
.nomedia फाईल तयार करण्यासाठी हे करा
WhatsApp च्या प्रतिमा फोल्डरमध्ये {{.nomedia}}.nomedia{{.nomedia}} फाईल तयार करू शकता. कृपया हे लक्षात घ्या की यामुळे तुमच्या फोन गॅलरी मधून सर्व WhatsApp फोटो लपविले जातील.
 1. तुम्ही Google Play स्टोअर वरून फाईल एक्सप्लोरर डाउनलोड करा.
 2. फाईल एक्सप्लोरर मध्ये Images/WhatsApp Images/ येथे जा.
 3. .nomedia अशी फाईल त्या समोरील पूर्णविरामासकट तयार करा.
जर तुम्हाला परत तुमचे फोटो गॅलरीमध्ये बघण्याची इच्छा झाली तर तुम्ही .nomedia फाईल डिलीट करून ते सहज करू शकता.
हे मदतीचे होते का?
होय
नाही