WhatsApp चा जबाबदारीने वापर कसा करावा


इतर लोकांशी साध्या, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने संवाद साधता यावा या उद्देशाने WhatsApp तयार करण्यात आले आहे. मेसेजिंग हे मुलभूतरीत्या खाजगी आहे आणि आमच्या सेवाशर्ती आमचा प्लॅटफॉर्म आणि आमचे वापरकर्ते सुरक्षित राहतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. WhatsApp चा जबाबदारीने वापर करण्यासाठी WhatsApp च्या सर्व वापरकर्त्यांनी खालील मार्गदर्शकतत्त्वांचे पालन केले पाहिजे.
सर्वोत्तम पद्धती
  • ओळखीच्या संपर्कांशी संवाद साधा: एखाद्या व्यक्तीने स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधला असेल किंवा तुम्ही WhatsApp द्वारे त्यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती त्यांनी स्वतःहून केली असेल, अशाच व्यक्तींना मेसेज पाठवावा. लोकांनी सर्वप्रथम तुम्हाला स्वत:हून मेसेज करावा यासाठी तुम्ही तुमचा फोन नंबर देणे उत्तम ठरेल.
  • परवानगी मागा आणि मर्यादांचा आदर करा: संपर्कांना ग्रुपमध्ये जोडण्यापूर्वी तुम्ही त्यांची परवानगी घेतली पाहिजे. कोणी एखाद्याला ग्रुपमध्ये जोडले आणि ते स्वतःहून ग्रुपमधून बाहेर पडले, तर त्यांच्या निर्णयाचा आदर करा.
  • ग्रुप नियंत्रणे वापरा: आम्ही WhatsApp ग्रुप्ससाठी 'केवळ ॲडमीनच मेसेज पाठवू शकतील' हे सेटिंग तयार केले आहे. तुम्ही ॲडमीन असाल, तर सर्व सहभागी सदस्य ग्रुपवर मेसेजेस पाठवू शकतात की केवळ ग्रुप ॲडमीनच ग्रुपवर मेसेजेस पाठवू शकतात, हे तुम्ही ठरवू शकता. हे फीचर वापरल्याने ग्रुप्समध्ये येणारे नकोसे मेसेजेस बंद होण्यास मदत होते. Android, iPhone, KaiOS किंवा वेब आणि डेस्कटॉप या प्लॅटफॉर्म्सवर ग्रुप ॲडमीन सेटिंग कशी बदलावी याविषयी अधिक जाणून घ्या.
  • मेसेजेस फॉरवर्ड करताना दोनदा विचार करा: आम्ही सर्व फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसकरिता लेबल तयार केले आहे आणि वापरकर्त्यांनी मेसेजेस शेअर करण्यापूर्वी पुन्हा विचार करावा यासाठी तुम्ही किती वेळा मेसेजेस फॉरवर्ड करू शकता यावर मर्यादा आणली आहे. एखादी गोष्ट खरी असल्याची तुम्हाला खात्री नसेल किंवा मेसेज कोणी लिहिला हे तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही तो मेसेज फॉरवर्ड करू नये असे आम्ही सुचवतो. चुकीच्या माहितीचा प्रसार कसा रोखावा याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
हे करू नका
खाली दिलेल्या कोणत्याही पद्धतीने WhatsApp चा वापर केल्यास तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते.
  • नकोसे मेसेजेस: एखाद्या संपर्काने तुम्ही त्यांना मेसेज पाठवू नये असे सांगितले असेल, तर तुम्ही त्यांना तुमच्या ॲड्रेस बुकमधून काढून टाकावे आणि त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये.
  • ऑटोमेटेड आणि भरपूर मेसेजेस पाठवणे: WhatsApp वरून भरपूर मेसेजेस, ऑटोमेटेड मेसेजेस पाठवण्याचा आणि ऑटो-डायल करण्याचा प्रयत्न करू नका. WhatsApp हे नकोसे मेसेजेस पाठवणारे खाते बॅन करण्यासाठी मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी आणि वापरकर्त्यांकडून येणारे रिपोर्ट्स या दोन्हींचा वापर करते. याशिवाय, अनधिकृत किंवा ऑटोमेटेड खाती किंवा ग्रुप्स तयार करू नका अथवा WhatsApp च्या अनधिकृत आवृत्त्या वापरू नका. WhatsApp वर ऑटोमेटेड आणि बल्क मेसेजिंगच्या गैरवापरास कशाप्रकारे प्रतिबंधित केले जाते यासंबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हा व्हाइट पेपर वाचू शकता.
  • जी संपर्क यादी तुमची नाही ती वापरणे: परवानगीशिवाय कोणाचाही फोन नंबर शेअर करू नका किंवा बेकायदेशीर स्रोतांमधून येणार डेटा वापरून WhatsApp वापरकर्त्यांना मेसेज पाठवणे किंवा त्यांना ग्रुप्समध्ये सामील करणे, हे कधीही करू नका.
  • ब्रॉडकास्ट लिस्टचा अतिवापर करणे: वापरकर्त्यांनी तुमचा फोन नंबर त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये समाविष्ट केलेला असेल, तरच त्यांना तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्ट वापरून पाठवलेले मेसेजेस मिळतात. कृपया लक्षात असू द्या, की ब्रॉडकास्ट मेसेजेसचा वारंवार वापर केल्यास लोक तुमच्या मेसेजेसची तक्रार नोंदवू शकतात. ज्या खात्यांची अनेकदा तक्रार केली जाते, ती खाती आम्ही बॅन करतो.
  • वैयक्तिक माहिती काढून घेणे: परवानगी नसलेल्या कोणत्याही हेतूंसाठी, ऑटोमेटेड किंवा मॅन्युअल टूल वापरून मोठ्या प्रमाणावर WhatsApp वरून माहिती काढणे टाळा. अशा प्रकारे वापरकर्त्यांकडून फोन नंबर, वापरकर्त्यांचे प्रोफाइल फोटो आणि WhatsApp वरील स्टेटस यांसारखी इतर माहिती काढून घेतल्यास आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन होते.
  • आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणे: आम्ही येथे याची आठवण करून देऊ इच्छितो, की चुकीची माहिती प्रकाशित करणे आणि धमकी देणारे, भीतीदायक, द्वेष व मत्सर असलेले आणि जातीय किंवा धार्मिक भावना दुखावणारे बेकायदेशीर वर्तन करणे हे आमच्या सेवाशर्तींनुसार निषिद्ध आहे. तुम्ही आमच्या सेवाशर्ती येथे वाचू शकता.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही