मी माझे व्हॉइस मेसेजेस किंवा व्हिडिओ का ऐकू शकत नाहीये?

iPhone
WhatsApp व्हॉइस मेसेजेस स्पीकर द्वारे प्ले करते किंवा जर तुम्ही फोन तुमच्या कानाजवळ नेला तर तो संदेश रिसिव्हर द्वारे प्ले होतो. जेव्हा तुम्ही फोन तुमच्या कानाजवळ नेता तेव्हा प्रॉक्सिमिटी सेन्सर चालू होतो आणि तुम्ही फोन कॉल वर असताना जशी होते तशी स्क्रीन बंद होते.
नोटिफिकेशन्स साठी, स्पीकर द्वारे मीडिया प्ले बॅक, रिसिव्हर व्हॉल्युम आणि हेडफोन व्हॉल्युम यासाठी तुमच्या फोनमध्ये वेगवेगळे व्हॉल्युम सेटिंग्ज अर्थात आवाज कमी जास्त करण्यासाठीचे सेटिंग्ज असतात आणि हे सेटिंग्ज वेगवेगळ्या ॲप्स मध्ये वेगळे असू शकतात. तुम्ही जर कधीच तो मीडिया ऐकू शकत नसाल तर मीडिया चालू असताना आवाज वाढविण्याचे बटण दाबून बघा. असे होणे शक्य आहे की तुम्ही जे आउटपुट व्हॉल्युम सेटिंग वापरत आहात ते अगदी कमी आहे.
संदेश ऐकत असताना जर तुम्हाला आवाज कमी जास्त करायचा असेल तर ते करत असताना कृपया फोन तुमच्या कानाच्या जवळ आणा.
जर तुमच्या असे लक्षत आले की तुमची स्क्रीन काळी होत आहे आणि तुम्ही व्हॉइस मेसेज स्पीकर द्वारे ऐकण्यास असमर्थ असाल तर तुम्ही कदाचित तुमचा प्रॉक्सिमिटी सेन्सर तुमच्या बोटामुळे किंवा तुमच्या हातामुळे बंद करत असाल. कृपया तुमचा हात योग्यप्रकारे वापरा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही