GIF फाइल्स कशा पाठवाव्यात
GIF फाइल्स कशा पाठवाव्यात
तुम्ही WhatsApp वरील वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटवर GIF फाइल्स पाठवू शकता.
- WhatsApp उघडा.
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- स्टिकर्स> GIF यावर टॅप करा.
- त्यानंतर हे करा:
- एखाद्या विशिष्ट GIF चा शोध घेण्यासाठी शोधवर टॅप करा.
- अलीकडेच वापरलेल्या GIF फाइल्स पाहण्यासाठी अलीकडीलवर टॅप करा.
- तुमच्या आवडत्या किंवा तारांकित GIF फाइल्स पाहण्यासाठी आवडीचेवर टॅप करा.
- एखाद्या विशिष्ट GIF चा शोध घेण्यासाठी शोध
- तुम्हाला पाठवायची आहे ती GIF फाइल निवडा आणि त्यावर टॅप करा.
- पाठवावर टॅप करा.
एखादी GIF फाइल 'आवडीचे' मध्ये जोडणे
एखादी GIF फाइल नंतर पटकन वापरता यावी यासाठी आवडीचे मध्ये जोडता येते.
- एखाद्या चॅटमधील GIF फाइलला 'आवडीचे' मध्ये जोडण्यासाठी त्या GIF वर टॅप करून धरून ठेवा आणि तारांकित करावर टॅप करा.
- GIF मेनूमधील एखाद्या GIF फाइलला 'आवडीचे' मध्ये जोडण्यासाठी त्या GIF वर टॅप करून धरून ठेवा आणि 'आवडीचे' मध्ये जोडा वर टॅप करा.
एखादी GIF फाइल 'आवडीचे' मधून काढून टाकणे
- आवडीचेवर टॅप करा, काढून टाकायची आहे त्या GIF वर टॅप करून धरून ठेवा आणि 'आवडीचे' मधून काढून टाका वर टॅप करा.