"या मेसेजची प्रतीक्षा करत आहे. याला थोडा वेळ लागू शकतो" हा मेसेज दिसत आहे

एखाद्या संपर्काने तुम्हाला मेसेज पाठवला असल्यास, त्या मेसेजच्या जागी तुम्हाला कधीकधी वरील मेसेज दिसू शकतो. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमुळे तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा फोनही ऑनलाइन असणे आवश्यक असते; त्यामुळे, तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा मेसेज मिळण्यासाठी वाट पाहावी लागू शकते. तुम्ही ज्या व्यक्तीशी चॅट करत आहात त्या व्यक्तीने नुकतेच WhatsApp पुन्हा इंस्टॉल केले असल्यास किंवा ती व्यक्ती WhatsApp ची जुनी आवृत्ती वापरत असल्यास असे होऊ शकते.
मेसेज प्राप्त करण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी:
  • तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेज पाठवत आहात त्या व्यक्तीला त्यांच्या फोनवर WhatsApp उघडण्यास सांगा.
  • तुम्ही दोघेही WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरत असल्याची खात्री करा.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया आमचा व्हाइट पेपर आणि हा लेख पहा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही