मेसेजवर प्रतिक्रिया कशा पाठवाव्यात

तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि ग्रुप चॅटवर इमोजी वापरून मेसेजवर प्रतिक्रिया देऊ शकता. तुम्ही मेसेजच्या खाली असलेल्या प्रतिक्रिया इमोजीवर टॅप करून मेसेजवरील सर्व प्रतिक्रिया पाहू शकता.
टीप:
 • तुम्ही एका मेसेजवर फक्त एक प्रतिक्रिया देऊ शकता.
 • एक्स्पायर होणाऱ्या मेसेजेसवरील प्रतिक्रिया मेसेज एक्स्पायर झाल्यावर नाहीशा होतील.
 • प्रतिक्रिया किंवा प्रतिक्रियांची संख्या लपवणे शक्य नाही.
 • तुम्‍ही प्रतिक्रिया काढण्‍यापूर्वी किंवा ती काढण्‍यात यश न आल्यास, प्राप्तकर्ते तुमची प्रतिक्रिया पाहू शकतात. प्रतिक्रिया काढून टाकणे यशस्वी झाले नाही, तर तुम्हाला त्याबाबत सूचित केले जाणार नाही.
मेसेजवर प्रतिक्रिया जोडणे
तुम्ही प्रतिक्रिया जोडता, तेव्हा ज्या मेसेजवर प्रतिक्रिया दिली जात आहे तो मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीलाच नोटिफिकेशन प्राप्त होईल.
 1. मेसेजवर जास्त वेळ दाबून ठेवा.
 2. त्यानंतर दिसणाऱ्या इमोजींपैकी एक निवडण्यासाठी टॅप करा किंवा तुमच्या कीबोर्डवरून कोणताही इमोजी निवडण्यासाठी
  वर टॅप करा..
तुमची प्रतिक्रिया बदलणे
तुम्ही तुमची प्रतिक्रिया बदलून दुसरी प्रतिक्रिया देऊ शकता.
 1. तुम्ही प्रतिक्रिया दिलेल्या मेसेजवर जास्त वेळ दाबून ठेवा.
 2. दुसऱ्या एखाद्या इमोजीवर टॅप करा किंवा तुमच्या कीबोर्डवरून एखादा इमोजी निवडण्यासाठी
  वर टॅप करा. .
प्रतिक्रिया काढणे
तुम्ही मेसेजवर दिलेली तुमची प्रतिक्रिया काढू शकता. तुम्ही प्रतिक्रिया काढून टाकल्यास मेसेज पाठवणाऱ्याला नोटिफिकेशन पाठवले जाणार नाही.
 1. तुम्ही प्रतिक्रिया दिलेल्या मेसेजवर जास्त वेळ दाबून ठेवा किंवा प्रतिक्रियेवर टॅप करा.
 2. तुम्ही प्रतिक्रियेसाठी वापरलेला इमोजी काढण्यासाठी त्यावर टॅप करा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही