मेसेजला प्रत्युत्तर कसे द्यावे

वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमधील विशिष्ट मेसेजला प्रतिसाद देताना तुम्ही 'प्रत्युत्तर द्या' फीचर वापरू शकता.

Android
  1. मेसेजवर उजवीकडे स्वाइप करा.
  2. तुमचा प्रतिसाद लिहा आणि पाठवा
    वर टॅप करा.
ग्रुपमध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला खाजगीरीत्या प्रत्युत्तर देण्यासाठी:
  1. मेसेजवर टॅप करून धरून ठेवा.
  2. अधिक पर्याय
    > खाजगीरीत्या प्रत्युत्तर द्या वर टॅप करा.
iPhone
  1. मेसेजवर उजवीकडे स्वाइप करा.
  2. तुमचा प्रतिसाद एंटर करा आणि पाठवा
    वर टॅप करा.
ग्रुपमध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला खाजगीरीत्या प्रत्युत्तर देण्यासाठी:
  1. मेसेजवर टॅप करून धरून ठेवा.
  2. अधिक > खाजगीरीत्या प्रत्युत्तर द्या यावर टॅप करा.
WhatsApp वेब आणि WhatsApp डेस्कटॉप
  1. मेसेजवर माउस पॉइंटर न्या. त्यानंतर, मेनू
    > प्रत्युत्तर द्या यावर क्लिक करा.
  2. तुमचा प्रतिसाद एंटर करा आणि पाठवा (
    किंवा
    ) वर क्लिक करा.
ग्रुपमध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला खाजगीरीत्या प्रत्युत्तर देण्यासाठी:
  1. मेसेजवर माउस पॉइंटर न्या. त्यानंतर, मेनू वर क्लिक करा.
  2. मेनू
    > खाजगीरीत्या प्रत्युत्तर द्या यावर क्लिक करा.
टीप: पाठवण्यापूर्वी तुम्हाला मेसेज रद्द करायचा असेल, तर मेसेजच्या उजवीकडील "x" आयकॉनवर टॅप किंवा क्लिक करा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही