तुमचा फोन नंबर WhatsApp वर आधीपासूनच असण्याविषयी
सगळी WhatsApp खाती मोबाइल फोन नंबरशी संलग्न असतात. अनेकवेळा मोबाइल कंपन्या जुने नंबर परत वापरण्यासाठी दुसऱ्यांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे तुमच्या सध्याच्या फोन नंबरच्या पूर्वीच्या मालकाने WhatsApp वापरलेले असू शकते.
तुमच्या फोन नंबरच्या पूर्वीच्या मालकाने त्यांचे WhatsApp खाते हटवलेले नसेल, तर तुम्ही नवे खाते सक्रिय करण्यापूर्वी तुम्हाला आणि तुमच्या संपर्कांना WhatsApp मध्ये तुमचा फोन नंबर दिसू शकतो. तुमच्या फोन नंबरसोबत कुणा दुसऱ्याचा प्रोफाइल फोटो आणि माझ्याबद्दल विभाग जोडलेला दिसू शकतो.
काळजी करण्याचे कारण नाही. याचा अर्थ फक्त असा होतो, की जुने खाते अजून हटवले गेलेले नाही, म्हणून सिस्टममध्ये अद्याप जुनी माहिती अस्तित्वात आहे. याचा अर्थ असा होत नाही, की फोन नंबरचा पूर्वीचा मालक तुम्ही तुमच्या नव्या फोन नंबरने सक्रिय केलेल्या WhatsApp खात्याला ॲक्सेस करू शकतो. तुमचे संभाषण आणि इतर WhatsApp डेटा सुरक्षित आहे.
पुन्हा वापरलेल्या फोन नंबरबाबतचा गोंधळ दूर होण्यात मदत व्हावी म्हणून आम्ही वापरल्या न जाणाऱ्या खात्यांकडे लक्ष ठेवतो. खाते ४५ दिवस वापरले गेले नाही आणि त्यानंतर नव्या मोबाइल डिव्हाइसवर नव्याने सक्रिय झाले, तर तो नंबर नव्या व्यक्तीला दिला गेला आहे असे आम्ही गृहीत धरतो. यावेळी, आम्ही त्या फोन नंबरशी संलग्न असलेला प्रोफाइल फोटो आणि माझ्याबद्दल विभाग असा जुन्या खात्याचा डेटा काढून टाकतो.