कार्ट वापरून ऑर्डर कशी द्यावी

Android
iPhone
तुम्ही WhatsApp वर बिझनेसच्या कॅटलॉगला भेट देता, तेव्हा तुम्ही संभाषण सुरू करण्यासाठी बिझनेसला मेसेज करा बटण वापरू शकता किंवा ऑर्डरची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कार्टमध्ये जोडा बटण वापरू शकता.
कार्टमध्ये प्रॉडक्ट्स जोडणे
 1. WhatsApp उघडा.
 2. बिझनेससोबतच्या तुमच्या चॅटवर किंवा त्यांच्या बिझनेस प्रोफाइलवर जा.
 3. बिझनेसचा कॅटलॉग उघडण्यासाठी बिझनेसच्या नावापुढे असलेल्या शॉपिंग बटण चिन्हावर
  टॅप करा.
 4. प्रॉडक्ट्समधून ब्राउझ करा.
 5. प्रॉडक्ट तुमच्या कार्टमध्ये जोडण्यासाठी प्रॉडक्टच्या पुढे असलेल्या
  चिन्हावर टॅप करा. प्रॉडक्टच्या माहितीचे पेज उघडण्यासाठी तुम्ही त्या प्रॉडक्टवर टॅपदेखील करू शकता. त्यानंतर, कार्टमध्ये जोडा वर टॅप करा.
  • तुमच्या कार्टमध्ये त्या प्रॉडक्टचे नग कमीजास्त करण्यासाठी
   किंवा
   वर टॅप करा.
टीप: प्रॉडक्टबद्दल प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही बिझनेसला मेसेज करा वरदेखील टॅप करू शकता. एकापेक्षा अधिक प्रॉडक्ट्सबद्दल विचारणा करायची असल्यास, ती सर्व प्रॉडक्ट्स तुमच्या कार्टमध्ये जोडा आणि तुमची चौकशी एकाच मेसेजमधून पाठवा. विक्रेत्याने कन्फर्म करेपर्यंत ऑर्डर फायनल होत नाही.
तुमची कार्ट संपादित करणे
 1. तुमच्या कार्टमध्ये जोडण्यात आलेली प्रॉडक्टस पाहण्याकरिता कार्ट पहा वर किंवा कॅटलॉग मेनूमधील अथवा बिझनेससोबतच्या तुमच्या मेसेजमधील
  वर टॅप करा.
 2. पुन्हा कॅटलॉगवर जाऊन आणखी प्रॉडक्ट्स जोडण्यासाठी आणखी जोडा वर टॅप करा.
 3. तुमच्या कार्टमध्ये विशिष्ट प्रॉडक्ट्सचे नग कमीजास्त करण्यासाठी
  किंवा
  वर टॅप करा.
ऑर्डर करणे
 1. तुम्ही तुमची कार्ट अपडेट केल्यानंतर, बिझनेसला पाठवा वर टॅप करा.
 2. कार्ट पाठवल्यानंतर, विक्रेत्यासोबतच्या चॅट विंडोमधील पाठवलेली कार्ट पहा बटणावर टॅप करून तुम्ही तुमच्या ऑर्डरचे तपशील पाहू शकता.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही