ग्रुप कसा तयार करावा आणि ग्रुपमध्ये कसे आमंत्रित करावे

Android
iOS
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
Mac
तुम्ही कमाल १०२४ सदस्यांचा WhatsApp ग्रुप तयार करू शकता.
ग्रुप तयार करणे
 1. WhatsApp मध्ये तुमच्या चॅट्सच्या सूचीच्या वर असलेल्या
  more options
  किंवा
  menu
  वर क्लिक करा.
  • किंवा नवीन चॅट आयकॉनवर क्लिक करा.
 2. नवीन ग्रुप वर क्लिक करा.
 3. तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा. त्यानंतर हिरव्या बाणाच्या खुणेवर क्लिक करा.
 4. ग्रुपला नाव द्या. हे ग्रुपचे ग्रुपमधील सर्व सदस्यांना दिसेल.
  • ग्रुपच्या नावामध्ये जास्तीतजास्त १०० कॅरेक्टर्स असू शकतात.
  • तुम्ही इमोजी आयकॉनवर क्लिक करून तुमच्या ग्रुपच्या नावामध्ये इमोजी जोडू शकता.
  • तुम्ही
   camera
   वर क्लिक करून ग्रुपचा फोटो जोडू शकता. फोटो जोडण्यासाठी, तुम्ही फोटो घ्या, फोटो अपलोड करा, इमेज आणि स्टिकर्स किंवा वेबवर शोधा यांपैकी एक पर्याय निवडू शकता. इमेज निवडून सेट केल्यानंतर, तुमच्या चॅट्सच्या सूचीमधील ग्रुपच्या नावासमोर ग्रुपचा फोटो दिसू लागेल.
   • टीप: वेब शोध ही सुविधा सध्या WhatsApp वेबवर उपलब्ध नाही आहे.
 5. सर्व झाल्यावर बरोबरच्या हिरव्या खुणेवर क्लिक करा.
लिंक वापरून ग्रुपमध्ये आमंत्रित करणे
तुम्ही ग्रुप ॲडमिन असल्यास, तुम्ही लोकांसोबत लिंक शेअर करून त्यांना ग्रुपमध्ये आमंत्रित करू शकता. जुनी निमंत्रण लिंक अवैध करून नवी लिंक तयार करण्यासाठी ॲडमिन कधीही लिंक रीसेट करू शकतात.
 1. WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
  • किंवा, वरच्या कोपऱ्यातील
   more options
   किंवा
   menu
   > ग्रुपची माहिती यावर क्लिक करा.
 2. लिंकद्वारे ग्रुपमध्ये आमंत्रित करा वर क्लिक करा.
 3. WhatsApp द्वारे लिंक पाठवा किंवा लिंक कॉपी करा निवडा.
  • WhatsApp द्वारे पाठवत असल्यास, संपर्क शोधा किंवा निवडा, त्यानंतर पाठवा वर क्लिक करा.
  • लिंक रीसेट करण्यासाठी, लिंक रीसेट करा > लिंक रीसेट करा यावर क्लिक करा.
टीप: तुम्ही ज्यांच्यासोबत आमंत्रण लिंक शेअर केली आहे असा कोणताही WhatsApp वापरकर्ता ग्रुपमध्ये सामील होऊ शकतो. हे फीचर फक्त विश्वासार्ह व्यक्तींसोबत वापरा. कारण, या व्यक्ती तुमची लिंक इतरांनाही फॉरवर्ड करू शकतात आणि लिंक मिळालेल्या इतर व्यक्तींना ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी ग्रुप ॲडमिनच्या संमतीची गरज लागत नाही.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही