ग्रुप कसा तयार करावा आणि ग्रुपमध्ये कसे आमंत्रित करावे

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही कमाल १०२४ सदस्यांचा WhatsApp ग्रुप तयार करू शकता.
ग्रुप तयार करणे
 1. WhatsApp मध्ये चॅट्स टॅबवर जा.
 2. नवीन चॅट
  > नवीन ग्रुप यावर टॅप करा.
  • तुमच्याकडे चॅट्स टॅबवर विद्यमान चॅट असल्यास, नवीन ग्रुप वर टॅप करा.
 3. तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा. त्यानंतर, पुढे वर टॅप करा.
 4. ग्रुपला नाव द्या. हे ग्रुपचे नाव असेल, जे सर्व सहभागी सदस्यांना दिसेल.
  • ग्रुपच्या नावामध्ये जास्तीतजास्त १०० कॅरेक्टर्स असू शकतात.
  • तुम्ही कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून ग्रुपचा फोटो जोडू शकता. तुम्ही इमेज जोडण्यासाठी फोटो घ्या, फोटो निवडा, इमोजी आणि स्टिकर्स किंवा वेबवर शोधा यांपैकी एक पर्याय निवडू शकता. सेट केल्यावर, चॅट्स टॅबमध्ये ग्रुपच्या शेजारी आयकॉन दिसू लागेल.
 5. पूर्ण झाल्यावर, तयार करा वर टॅप करा.
लिंक्स किंवा QR कोड वापरून ग्रुप्समध्ये आमंत्रित करणे
तुम्ही ग्रुप ॲडमिन असल्यास, तुम्ही लोकांसोबत लिंक किंवा QR कोड शेअर करून त्यांना ग्रुपमध्ये आमंत्रित करू शकता. जुनी निमंत्रण लिंक अवैध करून नवी लिंक तयार करण्यासाठी ॲडमिन कधीही लिंक रीसेट करू शकतात.
 1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
  • किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
 2. लिंकद्वारे ग्रुपमध्ये आमंत्रित करा वर टॅप करा.
 3. WhatsApp द्वारे लिंक पाठवणे, लिंक शेअर करणे, लिंक कॉपी करणे किंवा QR कोड यांपैकी एखादा पर्याय निवडा.
  • लिंक रिसेट करण्यासाठी, लिंक रिसेट करा > लिंक रिसेट करा यावर टॅप करा.
टीप: तुम्ही ज्यांच्यासोबत आमंत्रण लिंक शेअर केली आहे असा कोणताही WhatsApp वापरकर्ता ग्रुपमध्ये सामील होऊ शकतो. हे फीचर फक्त विश्वासार्ह व्यक्तींसोबत वापरा. ज्यांना लिंक फॉरवर्ड करण्यात आली आहे अशी कोणतीही व्यक्ती ग्रुप अ‍ॅडमिनच्या अतिरिक्त मंजुरीशिवाय ग्रुपमध्ये सामील होऊ शकते.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही