मेसेजला प्रत्युत्तर कसे द्यावे
वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमधील विशिष्ट मेसेजला प्रतिसाद देताना तुम्ही 'प्रत्युत्तर द्या' फीचर वापरू शकता.
Android
- मेसेजवर उजवीकडे स्वाइप करा.
- तुमचा प्रतिसाद लिहा आणि पाठवावर टॅप करा.
ग्रुपमध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला खाजगीरीत्या प्रत्युत्तर देण्यासाठी:
- मेसेजवर टॅप करून धरून ठेवा.
- अधिक पर्याय> खाजगीरीत्या प्रत्युत्तर द्या वर टॅप करा.
iPhone
- मेसेजवर उजवीकडे स्वाइप करा.
- तुमचा प्रतिसाद एंटर करा आणि पाठवावर टॅप करा.
ग्रुपमध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला खाजगीरीत्या प्रत्युत्तर देण्यासाठी:
- मेसेजवर टॅप करून धरून ठेवा.
- अधिक > खाजगीरीत्या प्रत्युत्तर द्या यावर टॅप करा.
WhatsApp वेब आणि WhatsApp डेस्कटॉप
- मेसेजवर माउस पॉइंटर न्या. त्यानंतर, मेनू> प्रत्युत्तर द्या यावर क्लिक करा.
- तुमचा प्रतिसाद एंटर करा आणि पाठवा (किंवा) वर क्लिक करा.
ग्रुपमध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला खाजगीरीत्या प्रत्युत्तर देण्यासाठी:
- मेसेजवर माउस पॉइंटर न्या. त्यानंतर, मेनू वर क्लिक करा.
- मेनू> खाजगीरीत्या प्रत्युत्तर द्या यावर क्लिक करा.
टीप: पाठवण्यापूर्वी तुम्हाला मेसेज रद्द करायचा असेल, तर मेसेजच्या उजवीकडील "x" आयकॉनवर टॅप किंवा क्लिक करा.