मला माझ्या WhatsApp चॅट्समध्ये नवीन सिस्टीम मेसेज का दिसत आहे?

WhatsApp वरील बिझनेसला मेसेज करण्याचा अर्थ काय आहे हे आम्हाला स्पष्ट करायचे आहे.
तुम्ही ज्या बिझनेसेससोबत WhatsApp वर चॅट करत आहात ते बिझनेसेस त्यांचे मेसेजेस व्यवस्थापित आणि स्टोअर करण्यात मदत व्हावी यासाठी Facebook किंवा इतर कंपन्यांचा वापर करू शकतात. एखादा बिझनेस त्यांचे मेसेजेस व्यवस्थापित करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या कंपनीचा वापर करण्याचा पर्याय निवडतो, तेव्हा आम्ही तुम्हाला पुढील सिस्टीम मेसेज दाखवून ते कळवू:
एखादा बिझनेस त्यांची चॅट्स स्वतःहून व्यवस्थापित करत असल्यास, तुम्हाला पुढील सिस्टीम मेसेज दिसेल:
एखाद्या बिझनेसने त्यांचे मेसेजेस होस्ट करण्यासाठी Facebook चा वापर करण्याचा पर्याय निवडला, तरीदेखील Facebook तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातींना त्याची माहिती देण्याकरिता तुमचे मेसेजेस आपोआप वापरणार नाही. कॉल सेंटर्स किंवा ईमेल यांसारख्या इतर कोणत्याही कम्युनिकेशन चॅनल्सप्रमाणेच बिझनेसेसदेखील त्यांच्या स्वतःच्या मार्केटिंगसाठी ग्राहकांसोबतची संभाषणे वापरू शकतात. यामध्ये Facebook वर किंवा इतर ठिकाणी जाहिरात करण्याचा समावेश असू शकतो. एखाद्या बिझनेसची गोपनीयता धोरणे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या बिझनेसशी संपर्क साधू शकता.
एखाद्या बिझनेसने तुम्हाला मेसेज करू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांना थेट चॅटमधून ब्लॉक करू शकता किंवा तुमच्या संपर्क यादीतून हटवू शकता.
नेहमीच खाजगी आणि सुरक्षित
डिव्हाइसमधून मेसेज जाण्यापूर्वी मेसेज सुरक्षित करणाऱ्या सिग्नल एन्क्रिप्शन प्रोटोकॉलने प्रत्येक WhatsApp मेसेजला सुरक्षित केले जाते. तुम्ही एखाद्या WhatsApp Business खात्यास मेसेज करता, तेव्हा तुमचा मेसेज त्या बिझनेसने निवडलेल्या ठिकाणी सुरक्षितरीत्या पोहोचवला जातो.
हे मदतीचे होते का?
होय
नाही