तुमचे WhatsApp Messenger खाते हे WhatsApp Business ॲपवर कसे हलवावे

Android
iPhone
WhatsApp Messenger वरून WhatsApp Business ॲपवर जाण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या खात्याचा बॅकअप घ्यावा अशी आम्ही शिफारस करतो. बॅकअप कसा तयार करावा हे जाणून घेण्यासाठी, हा लेख पहा.
  1. Apple App Store वरून WhatsApp Messenger अपडेट करा आणि WhatsApp Business ॲप डाउनलोड करा.
  2. WhatsApp Business ॲप उघडा.
  3. WhatsApp Business ॲप सेवाशर्ती वाचा. अटी स्वीकारण्यासाठी सहमती द्या आणि पुढे सुरू ठेवा वर टॅप करा.
  4. WhatsApp Business ॲप हे तुम्ही WhatsApp Messenger मध्ये वापरत असलेला नंबर आपोआप ओळखते. सुरू ठेवण्यासाठी, तुमचा बिझनेस नंबर असलेल्या पर्यायावर टॅप करा.
    • दाखवला जात असलेला नंबर हा तुम्हाला वापरायचा असलेला नंबर नसल्यास, दुसरा नंबर वापरा वर टॅप करा आणि सर्वसाधारण पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.
  5. WhatsApp तुम्हाला ६ अंकी कोड असलेला एसएमएस पाठवेल. तुमच्या नंबरची पडताळणी करण्यासाठी ६ अंकी कोड एंटर करा.
    • तुमची iCloud कीचेन सुरू केली असल्यास आणि तुम्ही आधी त्याच फोनवर या नंबरची पडताळणी केली असल्यास, तुम्हाला ही पायरी पूर्ण करण्याची गरज नाही.
  6. तुमचे बिझनेस प्रोफाइल तयार करा आणि पूर्ण झाले वर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही