सुरक्षा कोडमधील बदलाविषयीच्या नोटिफिकेशन्सबद्दल

तुम्ही आणि एखादी व्यक्ती यांच्यामधील मेसेजेस आणि कॉल्स हे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहेत का हे पडताळून पाहण्यासाठी तुमच्या प्रत्येक चॅटला एक स्वतंत्र सुरक्षा कोड असतो. हा कोड तुम्हाला संपर्क माहिती स्क्रीनमध्ये QR कोड आणि ६० अंकी कोड अशा दोन्ही स्वरूपात मिळू शकतो. प्रत्येक स्वतंत्र चॅटसाठी एक युनिक कोड असतो. तुम्ही ज्यांना मेसेजेस पाठवत आहात त्या व्यक्तीसोबत त्या कोडची तुलना करून तुम्ही पाठवलेले मेसेजेस एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहेत का याची पडताळणी करता येते. सुरक्षा कोड्स हे फक्त तुमच्यासोबत शेअर केलेल्या विशिष्ट कीच्या दृश्यमान आवृत्त्या आहेत - आणि काळजी करू नका, त्या वास्तविक की नाहीत, त्या कायम गोपनीय ठेवल्या जातात.
कधीकधी, तुमच्या आणि इतर व्यक्तींच्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेल्या चॅटमध्ये वापरलेले सुरक्षा कोड्स बदलू शकतात. तुम्ही किंवा तुमच्या संपर्काने WhatsApp परत इंस्टॉल केल्याने, फोन बदलल्याने किंवा पेअर केलेले डिव्हाइस जोडल्याने किंवा काढल्याने असे होऊ शकते. तुमच्या संपर्काचा सुरक्षा कोड वैध आहे का हे तुम्ही नेहमीच तपासून पाहू शकता. ते कसे करावे हे जाणून घेण्यासाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनबद्दलचा हा लेख पहा.
सुरक्षा कोड बदलल्याची नोटिफिकेशन्स मिळवणे
एखाद्या संपर्काच्या फोनमधील एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेल्या चॅटमधील सुरक्षा कोड बदलल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळावीत यासाठी तुम्ही सुरक्षा कोड नोटिफिकेशन्स सुरू करू शकता. तुम्हाला ज्या डिव्हाइसवर नोटिफिकेशन्स हवी आहेत त्या प्रत्येक डिव्हाइसवर हे सेटिंग सुरू करावे लागेल.
सुरक्षा कोड नोटिफिकेशन्स सुरू करणे
Android
 1. WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
  > सेटिंग्ज यावर टॅप करा.
 2. खाते > सुरक्षा यावर टॅप करा.
 3. या फोनवर सुरक्षा नोटिफिकेशन्स दाखवा सुरू करा.
iPhone
 1. WhatsApp सेटिंग्ज वर जा.
 2. खाते > सुरक्षा यावर टॅप करा.
 3. या फोनवर सुरक्षा नोटिफिकेशन्स दाखवा सुरू करा.
वेब आणि डेस्कटॉप
 1. WhatsApp उघडा > मेनू
  वर किंवा तुमच्या चॅट लिस्टच्या वरील भागातील
  सेटिंग्ज वर क्लिक करा.
 2. सुरक्षा वर क्लिक करा.
 3. या कॉंप्युटरवर सुरक्षा नोटिफिकेशन्स दाखवा सुरू करा.
सुरक्षा कोड नोटिफिकेशन्स बंद करणे
Android
 1. WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
  > सेटिंग्ज यावर टॅप करा.
 2. खाते > सुरक्षा यावर टॅप करा.
 3. या फोनवर सुरक्षा नोटिफिकेशन्स दाखवा बंद करा.
iPhone
 1. WhatsApp सेटिंग्ज वर जा.
 2. खाते > सुरक्षा यावर टॅप करा.
 3. या फोनवर सुरक्षा नोटिफिकेशन्स दाखवा बंद करा.
वेब आणि डेस्कटॉप
 1. WhatsApp उघडा > मेनू
  वर किंवा तुमच्या चॅट लिस्टच्या वरील भागातील
  सेटिंग्ज वर क्लिक करा.
 2. सुरक्षा वर क्लिक करा.
 3. या कॉंप्युटरवर सुरक्षा नोटिफिकेशन्स दाखवा बंद करा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही