तुमचा फोन नंबर कसा बदलावा

'नंबर बदला' या फीचरमुळे तुम्हाला त्याच फोनवर किंवा नव्या फोनवर WhatsApp शी लिंक असलेला फोन नंबर बदलण्यात मदत होते. तुमचा फोन नंबर बदलण्याआधी हे करा:
 • तुमच्या नवीन फोन नंबरवर SMS किंवा कॉल येत असल्याची आणि त्यामध्ये उत्तम मोबाइल इंटरनेट असल्याची खात्री करा.
 • तुमच्या जुन्या फोन नंबरची WhatsApp वर नोंदणी झालेली आहे याची खात्री करा. तुमचा WhasApp मधील नोंदणीकृत फोन नंबर पाहायचा असल्यास WhatsApp सेटिंग्ज वर जाऊन तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
फोन तोच ठेवून फोन नंबर बदलणे
तुमच्या फोनमध्ये नवीन फोन नंबरचे सिम कार्ड घाला. त्यानंतर, हे करा:
 1. WhatsApp सेटिंग्ज उघडा.
 2. खाते > नंबर बदला > पुढे यावर टॅप करा.
 3. पहिल्या फील्डमध्ये तुमचा जुना नंबर लिहा आणि त्यानंतरच्या फील्डमध्ये नवा फोन नंबर लिहा. हे दोन्ही नंबर आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये आहेत याची खात्री करा.
 4. पुढे वर टॅप करा.
  • संपर्कांना सूचित करा सुरू केल्यानंतर तुम्ही या बदलाविषयी कोणाला कळवू इच्छिता याची निवड करता येईल. यासाठी तुम्ही सर्व संपर्क, मी ज्यांच्याशी चॅट केले ते संपर्क किंवा ऐच्छिक... यांपैकी एका पर्यायाची निवड करू शकता. ऐच्छिक... या पर्यायाची निवड केल्यास तुम्हाला नक्की कोणाला कळवायचे आहे ते संपर्क शोधा किंवा निवडा आणि त्यानंतर पूर्ण झाले वर टॅप करा.
  • तुम्ही फोन नंबर बदलला आहे याची सूचना तुमच्या ग्रुप चॅटना मिळेल. तुम्ही फोन नंबर बदलला आहे हे तुमच्या संपर्कांना कळवण्याबाबतच्या निवडीचा यावर काही परिणाम होणार नाही.
 5. पूर्ण झाले वर टॅप करा.
 6. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नवीन फोन नंबरची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या जातील. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
नवीन फोनवर फोन नंबर बदलणे
तुम्हाला तुमच्या जुन्या फोनवरील पूर्वीचे चॅट नव्या फोनवर हलवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या फोनवर iCloud किंवा कॉंप्युटर बॅकअप तयार करायला लागेल. ते कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा. तुम्ही iCloud किंवा कॉंप्युटर बॅकअप घेणार नसाल, तर तुमचा बॅकअप रिस्टोअर कसा करावा हे जाणून घेण्यासाठी Apple सपोर्ट वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
तुमच्या जुन्या फोनवर WhatsApp शी लिंक असलेला फोन नंबर बदलून झाल्यावर तुमच्या नवीन फोनवर हे करा:
 1. WhatsApp इंस्टॉल करा.
 2. तुमच्या नवीन फोन नंबरची पुन्हा एकदा नोंदणी करा.
 3. तुमचा बॅकअप रिस्टोअर करा.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही