मला माझी WhatsApp साठी असलेली रिंगटोन कशी बदलता येईल?

iPhone
iPhone वर, WhatsApp मध्ये असलेल्या रिंगटोनव्यतिरिक्त दुसरी रिंगटोन निवडण्याचा कोणताही मार्ग नाही. जेव्हा ॲप बंद असते त्यासाठीची रिंगटोन तुम्हाला WhatsApp सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स यामधून बदलता येईल. येथे तुम्ही मेसेजेस, ग्रुप मेसेजेस आणि WhatsApp कॉल्ससाठी वेगवेगळ्या रिंगटोन्स निवडू शकता.
iOS 12 आणि तृतीय पक्ष कॉल इंटिग्रेशनमध्ये, फोनच्या Contacts ॲपमध्ये संपर्काकरिता सेट केलेली रिंगटोन WhatsApp व्हॉइस कॉलसाठीही वापरली जाते.
iOS 12 वर WhatsApp व्हॉइस कॉल्सकरिता कस्टम रिंगटोन सेट करण्यासाठी:
  1. तुमच्या iPhone च्या Contacts ॲपमध्ये जा.
  2. तुम्हाला ज्या संपर्कासाठी कस्टम रिंगटोन ठेवायची आहे तो संपर्क निवडा.
  3. स्क्रीनच्या वरील बाजूस उजवीकडे असणाऱ्या Edit बटणावर टॅप करा.
  4. रिंगटोन निवडा.
  5. तुमचा iPhone बंद करून परत सुरू करा.
टीप:
  • मेसेजेससाठी येणाऱ्या नोटिफिकेशनचे आवाज WhatsApp सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स येथे सेट करता येतील.
  • ग्रुप कॉल्ससाठी डीफॉल्ट रिंगटोन वापरली जाते. ही रिंगटोन कस्टमाइझ करता येत नाही.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही