WhatsApp Business खाते Instagram प्रोफाइलला कसे जोडावे

WhatsApp Business खाते वापरत असताना तुम्ही तुमचे Instagram खाते तुमच्या WhatsApp Business खात्याशी लिंक करू शकता.
बिझनेसशी संबंधित टीप: तुमचे Instagram प्रोफेशनल खाते तुमच्या WhatsApp Business खात्याशी लिंक केल्यामुळे तुमच्या Instagram प्रोफाइलवर WhatsApp वर जाण्यासाठी क्लिक करा बटण सुरू होते. WhatsApp वर जाण्यासाठी क्लिक करा बटणामुळे ग्राहकांना तुमच्या बिझनेसच्या संपर्कात राहणे सोपे होते आणि ग्राहकांची एंगेजमेंट वाढते.
ही खाती लिंक करण्यासाठी, तुमच्याकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे:
  • तुमच्या बिझनेसचे Instagram वरील प्रोफेशनल खाते.
  • WhatsApp Business ॲपवरील खाते.
  • मोबाइल ॲप्सची नवीनतम आवृत्ती.
तुमचे Instagram खाते WhatsApp Business ॲपशी लिंक करणे
तुम्ही WhatsApp Business ॲप मधून तुमचे Instagram आणि WhatsApp Business खाते लिंक करू शकता.
  1. WhatsApp Business ॲप उघडा.
  2. Android वर आणखी पर्याय वर टॅप करा. iPhone मधील सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. बिझनेस टूल्स > Facebook आणि Instagram यावर टॅप करा.
  4. Instagram > पुढे सुरू ठेवा यावर टॅप करा. यामुळे Instagram लॉगिन पेज उघडेल.
  5. तुमच्या Instagram खात्याची लॉगिन माहिती एंटर करा. लॉग इन करा वर टॅप करा. तुमचे Facebook खाते वापरून लॉग इन करण्यासाठी Facebook सह सुरू ठेवा वरही टॅप करू शकता.
  6. Instagram वर आधीपासूनच प्रोफेशनल खाते असल्यास, पुढील पायरीवर जा. प्रोफेशनल खाते नसल्यास, तुम्हाला तुमच्या खात्याचा प्रकार अपडेट करावा लागेल.
    1. पुढे वर टॅप करा.
    2. बिझनेस किंवा क्रिएटर निवडा. त्यानंतर, पुढे > पुढे > पुढे यावर टॅप करा.
  7. तुमची खाते माहिती कन्फर्म करा. जोडा > WhatsApp वर परत जा यावर टॅप करा.
तुम्ही WhatsApp Business ॲपवर परत आल्यानंतर, तुमचे लिंक केलेले Instagram प्रोफेशनल खाते Facebook आणि Instagram स्क्रीनच्या सर्वात वर दिसेल.
तुमचे लिंक केलेले Instagram खाते WhatsApp Business ॲपमधून काढणे
तुम्हाला यापुढे तुमची खाती कनेक्ट करायची नसतील, तर तुम्ही तुमच्या WhatsApp Business ॲपमधून तुमच्या Instagram आणि WhatsApp खात्यांची लिंक काढून टाकू शकता.
  1. WhatsApp Business ॲप उघडा.
  2. Android वर आणखी पर्याय वर टॅप करा. iPhone मधील सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. बिझनेस टूल्स > Facebook आणि Instagram यावर टॅप करा.
  4. तुमच्या लिंक केलेल्या Instagram खात्यावर टॅप करा > WhatsApp काढा > काढा यावर टॅप करा.
तुमचे खाते काढल्यानंतर ते Facebook आणि Instagram स्क्रीनवर दिसणार नाही.
टीप:
  • WhatsApp Business ॲप Instagram च्या सर्व बिझनेस कॅटेगरीजना सपोर्ट करत नाही. तुम्हाला "तुमच्या Instagram वरील बिझनेस कॅटेगरीला WhatsApp वर सपोर्ट नाही" असा एरर मेसेज दिसला, तर तुम्हाला तुमची खाती यशस्वीपणे लिंक करण्यासाठी WhatsApp कॉमर्स पॉलिसीचे पालन करण्याकरिता तुमची Instagram बिझनेस कॅटेगरी बदलावी लागेल.
  • तुमची खाती लिंक करण्यासाठी WhatsApp खालील माहिती Facebook सह शेअर करते:
    • Instagram वर तुमचे प्रोफेशनल खाते नसल्यास, तुमची WhatsApp बिझनेस कॅटेगरी Instagram वरील प्रोफेशनल बिझनेस कॅटेगरी सेट करण्यासाठी वापरली जाते. तुमचे Instagram वर आधीपासूनच प्रोफेशनल खाते असेल, तर तुमची WhatsApp Business कॅटेगरी शेअर केली जात नाही.
    • तुमच्या Instagram प्रोफाइलवरून ग्राहकांना तुम्हाला WhatsApp वर मेसेज पाठवता यावा यासाठी तुमचा WhatsApp Business फोन नंबर वापरला जातो.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही