WhatsApp QR कोड कसा स्कॅन करावा

Android
iPhone
WhatsApp QR कोड स्कॅन करणे हा WhatsApp वर असलेल्या बिझनेसशी कनेक्ट करण्याचा एक साधासोपा मार्ग आहे. WhatsApp कॅमेऱ्याने फक्त अधिकृत WhatsApp QR कोड स्कॅन करता येतात.
बिझनेसचा QR कोड स्कॅन करणे
स्वत: स्कॅन करणे
 1. WhatsApp उघडा, सेटिंग्ज वर टॅप करा.
 2. तुमच्या नावाच्या बाजूला दिसणाऱ्या QR चिन्हावर टॅप करा.
 3. स्कॅन करा > ठीक आहे यावर टॅप करा.
 4. QR कोड स्कॅन करण्यासाठी तुमचे डिव्हाइस QR कोडच्या वर धरा.
 5. चॅट करणे सुरू ठेवा वर टॅप करा.
तुम्ही WhatsApp कॅमेऱ्याच्या मदतीनेही स्कॅन करू शकता. त्यासाठी:
 1. WhatsApp उघडा आणि कॅमेरा वर टॅप करा.
 2. QR कोड स्कॅन करण्यासाठी तुमचे डिव्हाइस QR कोडच्या वर धरा.
iPhone 6s किंवा त्यापुढील आवृत्ती असल्यास तुमच्या होम स्क्रीनवर दिसणाऱ्या WhatsApp आयकॉनवर टॅप करून धरून ठेवा. असे केल्याने क्विक ॲक्शन मेनू उघडेल. त्यानंतर WhatsApp कॅमेरा उघडण्यासाठी कॅमेरा वर टॅप करा.
'फोटो' मधून स्कॅन करणे
 1. WhatsApp उघडा, सेटिंग्ज वर टॅप करा.
 2. तुमच्या नावाच्या बाजूला दिसणाऱ्या QR चिन्हावर टॅप करा.
 3. स्कॅन करा वर टॅप करा आणि त्यानंतर, स्क्रीनच्या तळाशी असलेल्या फोटो चिन्हावर टॅप करा.
 4. स्कॅन करण्यासाठी WhatsApp QR कोड असलेली इमेज निवडा.
WhatsApp कॅमेऱ्यातून स्कॅन करणे
 1. WhatsApp उघडा आणि कॅमेरा वर टॅप करा.
 2. स्क्रीनच्या तळाशी असलेल्या फोटो चिन्हावर टॅप करा.
 3. स्कॅन करण्यासाठी WhatsApp QR कोड असलेली इमेज निवडा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही