'तात्काळ प्रत्युत्तरे' हे फीचर कसे वापरावे

'तात्काळ प्रत्युत्तरे' हे फीचर वापरून, तुम्हाला तुमच्या ग्राहकांना वारंवार पाठवाव्या लागणाऱ्या मेसेजेससाठी शॉर्टकट्स तयार करता येतात. यामध्ये इमेजेस आणि व्हिडिओ यांसारखे मीडिया मेसेजेस समाविष्ट असू शकतात.
टीप: तुम्ही कमाल ५० तात्काळ प्रत्युत्तरे स्टोअर करू शकता.
'तात्काळ प्रत्युत्तरे' सेट करणे
 1. WhatsApp Business ॲपमध्ये, अधिक पर्याय
  > बिझनेस टूल्स > तात्काळ प्रत्युत्तरे यावर टॅप करा.
 2. जोडा
  वर टॅप करा.
 3. तुम्हाला हवा असलेला मेसेज तयार करण्यासाठी मेसेज वर टॅप करा.
  • टीप: वेब किंवा डेस्कटॉप यावर मीडिया फाइल्सना सपोर्ट नाही.
 4. तुमच्या तात्काळ प्रत्युत्तरासाठी कीबोर्ड शॉर्टकट सेट करण्याकरिता शॉर्टकट वर टॅप करा.
 5. सेव्ह करा वर टॅप करा.
डिफॉल्ट प्रत्युत्तरे
तुमच्या ग्राहकांशी संवाद साधणे आणखी सोपे करण्यासाठी, WhatsApp Business ॲप तुमच्या बिझनेस प्रोफाइलमधील माहितीच्या आधारे तात्काळ प्रत्युत्तरे तयार करते. तात्काळ प्रत्युत्तरामध्ये तुम्ही तुमच्या कामाचे तास, तुमचा पत्ता आणि तुमची प्रोफाइलदेखील समाविष्ट करून पाठवू शकता. ही डीफॉल्ट प्रत्युत्तरे पाहण्यासाठी:
 • चॅट उघडा, मेसेज वर टॅप करा आणि "/" टाइप करा किंवा
 • चॅट उघडा, अटॅच करा
  > तात्काळ प्रत्युत्तरे यावर टॅप करा.
‘तात्काळ प्रत्युत्तरे’ वापरणे
अटॅचमेंट म्हणून:
 1. एखादे चॅट उघडा.
 2. अटॅच करा
  > तात्काळ प्रत्युत्तरे यावर टॅप करा.
 3. हवे असलेले तात्काळ प्रत्युत्तर निवडा. मेसेज लिहिण्याच्या जागेमध्ये मेसेज आपोआप दिसायला लागेल.
 4. मेसेज संपादित करा किंवा फक्त पाठवा
  वर टॅप करा.
मेसेज लिहिण्याच्या जागेमधून:
 1. एखादे चॅट उघडा.
 2. मेसेज वर टॅप करा, त्यानंतर "/" टाइप करा. यामुळे तुमच्या सर्व डीफॉल्ट प्रत्युत्तरांसह तात्काळ प्रत्युत्तरेदेखील दिसतील.
 3. हवे असलेले तात्काळ प्रत्युत्तर निवडा. मेसेज लिहिण्याच्या जागेमध्ये मेसेज आपोआप दिसायला लागेल.
 4. मेसेज संपादित करा किंवा फक्त पाठवा
  वर टॅप करा.
बिझनेसशी संबंधित टीप: तुमच्या ग्राहकांना तुमचा पत्ता, कामाचे तास आणि इतर बऱ्याच गोष्टी कळवण्यासाठी वापरता येतील अशी डीफॉल्ट प्रत्युत्तरे जनरेट करण्यासाठी तुमच्या बिझनेस प्रोफाइलमधील प्रत्येक विभागातील माहिती पूर्णपणे दिली आहे याची खात्री करा.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही