'एक्स्पायर होणारे मेसेजेस' याविषयी माहिती

अतिरिक्त गोपनीयतेसाठी तुम्ही 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे पर्यायी फीचर सुरू करू शकता.
तुम्ही 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करता, तेव्हा मेसेजेस पाठवल्यानंतर ते २४ तासांनी, ७ दिवसांनी किंवा ९० दिवसांनी नाहीसे होण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. तुमची सर्वात अलीकडील निवड ही चॅटमधील फक्त नवीन मेसेजेसना लागू होते. तुम्ही तुमच्या सर्व चॅट्ससाठी किंवा विशिष्ट चॅट्स निवडून त्या चॅट्समध्ये 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' सुरू करू शकता. या सेटिंगचा तुम्ही ते सेटिंग सुरू करण्याआधी पाठवलेल्या किंवा तुम्हाला मिळालेल्या मेसेजेसवर परिणाम होत नाही. वैयक्तिक चॅटमध्ये ज्या दोन व्यक्तींमध्ये चॅट सुरू आहे त्यापैकी कोणीही 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू किंवा बंद करू शकते. ग्रुप चॅट असल्यास, ग्रुपचा कोणताही सदस्य 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू किंवा बंद करू शकतो. तथापि, फक्त ॲडमिन्सना 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' सुरू किंवा बंद करायची अनुमती द्यायची असल्यास ग्रुप ॲडमिन तशा पद्धतीने ग्रुप सेटिंग्ज बदलू शकतो.
  • हे सेटिंग सुरू केल्यानंतर एखाद्या वापरकर्त्याने २४ तास, ७ दिवस किंवा ९० दिवस WhatsApp न उघडल्यास, त्यांना आलेले मेसेजेस नाहीसे होतील. पण WhatsApp उघडले नाही, तरी आलेल्या मेसेजेसचे पूर्वावलोकन नोटिफिकेशन्समधून करता येऊ शकते.
  • सर्वसाधारणपणे, तुम्ही एखाद्या मेसेजला उत्तर देता तेव्हा तो मेसेज कोट केला जातो. तुम्ही एक्स्पायर होणाऱ्या मेसेजला उत्तर दिल्यास, कोट केलेला मेसेज तुम्ही निवडलेल्या कालावधीनंतरही उपलब्ध असू शकतो.
  • ज्या चॅटमध्ये 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' बंद आहे अशा चॅटला एक्स्पायर होणारा मेसेज पाठवल्यास आणि तो मेसेज फॉरवर्ड झाल्यास, तो मेसेज नाहीसा होणार नाही.
  • एखाद्या वापरकर्त्याने मेसेज एक्स्पायर होण्यापूर्वी बॅकअप घेतला असल्यास ते मेसेजेस बॅकअपमध्ये उपलब्ध असतील. मात्र, बॅकअप रिस्टोअर केल्यानंतर ते एक्स्पायर होणारे मेसेजेस बॅकअपमधून हटवले जातील.
टीप: 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर फक्त तुमच्या विश्वासातील व्यक्तींसोबतच वापरा. कारण एखादी व्यक्ती:
  • एक्स्पायर होणारा मेसेज फॉरवर्ड करू शकते किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकते, थोडक्यात तो एक्स्पायर होण्यापूर्वी सेव्ह करून ठेवू शकते.
  • मेसेज एक्स्पायर होण्यापूर्वी त्यातील आशय कॉपी करून सेव्ह करू शकते.
  • एक्स्पायर होणाऱ्या मेसेजचा तो एक्स्पायर होण्यापूर्वी कॅमेऱ्याने किंवा इतर डिव्हाइसने फोटो घेऊ शकते.
तुमच्या खात्यासाठी 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर
तुम्ही सर्व नवीन स्वतंत्र चॅट्ससाठी 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करू शकता.
  • iPhone आणि Android: WhatsApp सेटिंग्ज वर जा > खाते > गोपनीयता > डिफॉल्ट मेसेज टायमर यावर टॅप करा आणि कालावधी निवडा.
एक्स्पायर होणाऱ्या मेसेजेसमधील मीडिया फाइल्सचे काय होते
WhatsApp वरून डाउनलोड केलेल्या मीडिया फाइल्स बाय डीफॉल्ट तुमच्या फोटोंमध्ये आपोआप सेव्ह होतात. 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' सुरू असल्यास, चॅटमधून पाठवलेल्या मीडिया फाइल्स चॅटसोबत नाहीशा होतील, मात्र 'ऑटो-डाउनलोड' सुरू असल्यास त्या तुमच्या फोनवर सेव्ह होतील. तुम्ही WhatsApp सेटिंग्ज > स्टोरेज आणि डेटा मध्ये ऑटो-डाउनलोड बंद करू शकता.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही