टू-स्टेप व्हेरिफिकेशन सेटिंग्ज कशी व्यवस्थापित करावीत

तुम्ही तुमच्या WhatsApp खात्यातून टू-स्टेप व्हेरिफिकेशन सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकता. तुमच्याकडे हे फीचर सुरू किंवा बंद करणे, पिन बदलणे किंवा टू-स्टेप व्हेरिफिकेशनशी लिंक केलेला ईमेल ॲड्रेस अपडेट करणे हे पर्याय असतात.
टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करणे
 1. WhatsApp सेटिंग्ज उघडा.
 2. खाते > टू-स्टेप व्हेरिफिकेशन > सुरू करा यावर टॅप करा.
 3. तुम्हाला हवा तो ६ अंकी पिन एंटर करा आणि तो कन्फर्म करा.
 4. तुमच्याकडे ॲक्सेस आहे असा ईमेल ॲड्रेस द्या किंवा ईमेल ॲड्रेस द्यायचा नसल्यास वगळा वर टॅप करा. ईमेल ॲड्रेस दिल्याने टू-स्टेप व्हेरिफिकेशन रिसेट करण्यात आणि पर्यायाने तुमचे खाते सुरक्षित राखण्यात मदत होत असल्याने तुम्ही ईमेल ॲड्रेस द्यावा असे आम्ही सुचवतो.
 5. पुढे वर टॅप करा.
 6. ईमेल ॲड्रेस कन्फर्म करा आणि सेव्ह करा किंवा पूर्ण झाले वर टॅप करा.
तुम्ही ईमेल ॲड्रेस दिलेला नसेल आणि तुम्ही पिन नंबर विसरलात, तर तुमचा पिन रिसेट करण्यासाठी तुम्हाला ७ दिवस वाट पाहावी लागते. तुमचा ईमेल ॲड्रेस योग्यप्रकारे लिहिला आहे का याची पडताळणी होत नसल्याने तुम्ही तो अचूक लिहिला आहे याची खात्री करा.
टू-स्टेप व्हेरिफिकेशन बंद करणे
 1. WhatsApp सेटिंग्ज उघडा.
 2. खाते > टू-स्टेप व्हेरिफिकेशन>बंद करा > बंद करा यावर टॅप करा.
तुमचा टू-स्टेप व्हेरिफिकेशन पिन बदलणे
 1. WhatsApp सेटिंग्ज उघडा.
 2. खाते>टू-स्टेप व्हेरिफिकेशन> पिन बदला यावर टॅप करा.
ईमेल ॲड्रेस जोडणे
 1. WhatsApp सेटिंग्ज उघडा.
 2. खाते > टू-स्टेप व्हेरिफिकेशन यावर टॅप करा आणि त्यानंतर ईमेल ॲड्रेस जोडा वर टॅप करा.
ईमेल ॲड्रेस बदलणे
 1. WhatsApp सेटिंग्ज उघडा.
 2. खाते > टू-स्टेप व्हेरिफिकेशन यावर टॅप करा आणि त्यानंतर ईमेल ॲड्रेस बदला वर टॅप करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही